आलदंडी येथील पुलाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडणार

 

 

जिल्हा प्रतिनिधी // इशांक दहागावकर

एटापल्ली: जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या सुरजागड लोह खनिज प्रकल्पाचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. या प्रकल्पामुळे अनेकांना रोजगार प्राप्त झाला असला तरी सदर पहाडीवरील खनिज वाहतूक करण्याकरिता मोठ्या प्रमाणात या अवजड वाहनांचा उपयोग केला जातो. सध्या स्थितीत पावसाळ्यात या अवजड वाहनांमुळे सुरजागड लोहखनिज मार्गावरील आलदंडी पूल हा लवकरच तुटून पडण्याचा मार्गावर आहे. मुख्यालयापासून ८ किलोमीटर अंतरावर हा आलदंडी पूल असून पावसाळ्यात पुरामुळे हा मार्ग बंद असतो आणि आलदंडी पुलाची दशा अतिशय वाईट होण्याचा मार्गावर दिसत आहे. एटापल्ली तालुक्यात सुरजागड पहाडीवरून लोहखनिज उत्खनन करून वाहतूक केली जात आहे. सदर प्रकल्प त्रिवेणी अर्थमूव्हर्स या कंपनीद्वारे राबवला जात आहे. सदर खनिजाची वाहतुकीसाठी शेकडो अवजड वाहने एटापल्ली ते सुरजागड असा प्रवास करीत आहे. या खनिज वाहतुकी दरम्यान अवजड वाहनांच्या दिवस रात्र वाहतुकीमुळे ग्रामस्थांमध्ये ये-जा करण्याकरता भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. आलदंडी पूल हा लवकरच तुटून पडणार असं दिसून येत आहे. याचा फटका या मार्गावर असलेल्या अनेक गावातील ग्रामस्थांना होईल. या आदिवासी बांधवांना कोणतेही शासकीय-निमशासकीय काम असले तर त्यांना मुख्यालय गाठावा लागते. पण जर सतत या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे आलदंडी पूल हा लवकरच तुटून पडेल आणि आणि संपर्क तुटेल अशी शिवसेना युवासेना पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी शासकीय विश्रामगृह एटापल्ली येथे चर्चा करण्यात आली. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आलंदंडी पुलाची दुरुस्ती करण्यात यावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलनाची भूमिका हाती घेईल. याप्रसंगी मनीष दुर्ग शिवसेना तालुकाप्रमुख एटापल्ली, अक्षय पुंगाटी युवा-सेना तालुकाप्रमुख, सलीम शेख विभाग प्रमुख, नामदेव हिचामी नगरसेवक नगरपंचायत एटापल्ली,दल्लू पुसली शिवसेना उपतालुकाप्रमुख, दीपक दत्ता तालुका समन्वयक, निहाल कुंभारे शहर प्रमुख, सुमित खन्ना युवासेना शहर प्रमुख, तेजस भाऊ गुजलवार शाखाप्रमुख शिवसेना, संदीप बारई आदी बहुसंख्येने उपस्थित होते.