आष्टी तालुक्यातील आष्टी-मोर्शी-वरुड़ टी पॉईंट येथे रात्री आठ दहा मोकाट कुत्र्यांनी गाईच्या वासरा वर हमला केला.याची माहिती भाजपा युवा मोर्चा वर्धा जिल्हा महामंत्री आवेज़ खान यांना भेटल्यावर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कुत्र्यांच्या तावडीतून वासराची सुटका केली.व आष्टी येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथे आणले पण त्या ठिकाणी कोणताही कर्मचारी उपलब्ध नसल्याने श्री खान चांगलेच संतापले व त्यांनी त्या ठिकाणावरून पशुवैद्यकीय अधिकारी यांना याची माहिती दिली असता त्यांनी आपन रजेवर असुन उडवा उडवीचे उत्तरे दिली.आष्टी हे तालुक्याचे ठिकाण असून सुद्धा या ठिकाणी अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याची ओरड अनेक दिवसांपासून नागरिक करत आहे.आज त्याचा प्रत्यय भाजपच्या नेत्याला आला.त्यांनतर त्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना फोन केले असता त्यांनी सुद्धा आपण मुख्यालयी नसल्याचे सांगितले या वर संतापलेले खान यांनी कर्मचारी यांना इथेच ठाण मांडून बसत असल्याची माहिती दिली असता तब्बल दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर दोन कर्मचारी त्या ठिकाणी अवतरले. हिच घटना जर आपल्या परिवारातील एखादा सदस्या सोबत घडली असता तर आपण अश्याच पद्धतीने वागनुक दिली असती का असा प्रश्न आवेज खान यांनी केला.त्यावर पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचारी निरुत्तर झाले.पण पशुवैद्यकीय अधिकारी हे नागपूर येथुन येजा करत असल्याने या ठिकाणी निवासी अधिकारी नसल्याची ओरड उपस्थित नागरिकांनी केली. सर्व अधिकारी व कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणी मुख्यालयी राहावे याची तक्रार आपण आर्वी विधानसभेचे आमदार दादाराव केचे यांच्या मार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे आवेज खान यांनी बोलतांना सांगितले.सात आठ मोकाट कुत्र्या पासून वासराला वाचविल्या बद्दल अनेकांनी भाजपच्या कार्यकर्त्यानचे कौतुक केले.शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने त्यावर नगरपंचायतीने योग्य ते उपाय योजना कराव्या अशी मागणी जनतेतून होत आहे. निरागस वासराला कुत्र्यांच्या तावडीतून आवेज खान यांनी मुक्तता केली व त्याला त्यांच्या प्रभागातील नागरिकाच्या घरी सुखरूप नेऊन ठेवले. या वेळी आवेज खान यांच्या सह भाजपा युवा मोर्चा आर्वी विधानसभा सहप्रमुख प्रज्वल चोहटकर, भाजपा युवा मोर्चा आष्टी शहर अध्यक्ष अविनाश कदम,स्वराज शिरभाते,शुभम धकिते, प्रसाद साठवणे, जुबेर पठाण, समीर शेख भीमराव रावकाळे यांनी सहकार्य केले.