आमदार दादाराव केचे यांनी आर्वी तालुक्यातील उद्भवलेल्या परीस्थितीबाबत केली मौका पाहणी

 

कारंजा तालुका प्रतिनिधी // धिरज कसारे

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार सोबत बिकट परिस्थिती लक्षात घेऊन आमदार दादाराव केचे यांनी याबाबत दुरध्वनीने केला संपर्क

प्रशासकीय व शासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभाराने या गावात दुर्दैवाने परिस्थिती उद्भवली

सालधरातील खंडीत पाणी पुरवठा पुर्ववत होईस्तोवर टॅन्करने पाणी पुरवठा करावा

आर्वी:तालुक्यातील सालधरा, हुसेनपुर, बोरीबाऱ्हा, सोरटा, सालफळ, खैरी, पिंपळगाव व वाई येथील तलाव बाधबस्तीची कामे न केल्याने गावालगतचा नाला तुडुंब भरून वाहत होता. हि बाब आमदार दादाराव केचे यांना सालधरा येथील ग्रामस्थ व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कळवले असता आमदार दादाराव केचे यांनी तातडीने मौका पाहणी केली. यावेळी विद्याधर चव्हाण तहसीलदार आर्वी, गावंडे गटविकास अधिकारी पंचायत समिती आर्वी,बिसावाला उपविभागीय अभियंता पाटबंधारे
, कु. सुप्रिया वायवाड कृषी अधिकारी आर्वी तालुका, ससाणे उपविभागीय अधिकारी जलसंधारण, सतिश सांगळे उपविभागीय कृषी अधिकारी आर्वी, मगर नायब तहसीलदार आर्वी, साबळे उपविभागीय अभियंता लघुसिंचन, ढगे कृषीपर्यवेशक, कु. घाटोले पटवारी मौजा सालधरा, शेख पटवारी मौजा सालधरा, डेहनकर पटवारी हुसेनपुर, खंडागडे ग्राम सेवक हुसेनपुर, घोटे कृषी सहाय्यक, पाठक पटवारी सोरटा,

आमदार दादाराव केचे यांनी वस्तुस्थितीची सविस्तर माहिती घेत उद्भवलेल्या परीस्थितीवर उपस्थिती शासकीय अधिकाऱ्यांन सोबत चर्चा करत अशी घटना घडायला नको होती असे आमदार दादाराव केचे यांनी म्हणून कानपिचक्या घेऊन अधिकाऱ्याकडून अशी चुक अपेक्षित नसल्याचे स्पष्ट शब्दात बजावले. संततधार पाऊस सुरू असल्याने सालधरा तलाव तुडुंब भरून वाहू लागला कमकुवत झालेला सिमेंट बंधारा फुटला व त्या धरनाचे पाणी सालधरा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहीर असलेल्या शेतातुन व वहिरीतुन गढुळ पाणी तुडुंब भरून वाहत असल्याने गाकऱ्यांना पाणीपुरवठाची योजना विस्कळीत झाल्याने पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. या बाबत आमदार दादाराव केचे यांनी तहसीलदार यांना तात्काळ टॅन्करने शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी निर्देश देत पाण्यामुळे शेत जमिनीची उत्खनन झाल्याने व काही क्षेत्र पाण्यात वाहून निघाल्याने शेत जमिनीचे तात्काळ पंचनामे करून शासन दरबारी सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले असुन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई आर्थिक स्वरूपात तातडीने मिळवून देण्यासाठी सर्व विभागाने समन्वय साधून तात्काळ मदत करावी असे निर्देश आमदार दादाराव केचे यांनी दिले. खैरी येथील पुलाची पुरामुळे वाहुन गेल्याने पाहनी करत सबंधित अधिकाऱ्यांना सदर पुल पुर्व स्थितीत पहिले पेक्षा जास्त तांत्रिक क्षमतेने बनविण्याचे निर्देश दिले.

त्याच प्रमाणे सालधरा प्रमाणेच हुसेनपुर, बोरीबाऱ्हा, सोरटा, वाई, पिंपळगाव या गावातील परीस्थिती गाव तलावांमुळे सालधरा या गावा सारखीच परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे ग्रामवासी, शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकरी आधिच संकटात असतांना आता नविन संकटाचे डोंगर त्याच्या शिरावर विराजमान झाले आहे असे आमदार दादाराव केचे यांनी सांगत ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘आपले सरकार’ आले असल्यामुळे काळजी करण्याची गरज नाही मी स्वतः सभागृहात हा प्रश्न लावून धरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडुन भविष्यात अशी घटना घडूच नये या दृष्टीने शाश्वत मदत हक्काने आणुन या गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार दादाराव केचे यांनी सांगितले.

यावेळी राजेश हिवसे रोहना सर्कल प्रमुख भाजपा, अशोक निकम विरूळ सर्कल प्रमुख भाजपा, निलेराजेश सावरकर सरपंच रसुलाबाद, बाबु चाफले, प्रज्वल कांडलकर, रवी खुरसंगे सरपंच, संगिता नेवारे पोलीस पाटील, पुरूषोत्तम राऊत ग्रा. पं. सदस्य, निलकंठ चव्हाण ग्रा. पं सदस्य, हरीभाऊ राऊत ग्रा. पं सदस्य, अशोक चोले ग्रा. पं. सदस्य, सुरेश चोले ग्रा. पं. सदस्य, सुरेश राऊत, मानिक पंधराम, प्रफुल्ल साठे, दिनेश गळहाट, विजय देवकर, देविदास कुरछडकर, मनोहर ढोबाळे, मंगेश मानकर, वाल्मिक माजरखेडे, सचिन गाडेकर, महेंद्र मानकर, प्रशांत गावंडे, सौ. चंदाबाई कुंडी सरपंच वाई पिपळझरी, देवेंद्र अहिरकर, प्रमोद गचकेश्वर, नारायण महाजन, लक्ष्मण डाहाट, भिमराव दाहाट, भाऊराव अहिरकर, निखिल कडू यांच्या सह अनेक गावकऱ्यांची उपस्थिती होती.