आर्वी तालुक्यातील बोरीबारा येथील तलाव पुर्ण भरल्यामुळे झालेल्या परिस्थितीचा विचार करून माजी आमदार अमर काळे यांनी केली पाहणी

 

माजी आमदार यांनी त्यांची रसुलाबाद येथे भेट घेऊन त्यांचे पुनर्वसन तातडीने करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याबाबत आश्वस्त केले

 

आर्वी तालुक्यातील बोरीबारा येथील तलाव पूर्ण भरल्यामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थिती चा विचार करून बोरीबारा येथील नागरिकांना रसुलाबाद येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.दि.१८ जुन रोजी आर्वी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अमर काळे यांनी रसुलाबाद येथे पुरग्रस्तांची भेट घेतली. त्यांचे पुनर्वसन तातडीने करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याबाबत अमर काळे यांनी त्यांना आश्वस्त केले.गावातील इतर नागरिकांची,शेतकऱ्यांशी सुद्धा चर्चा केली व गावातील नुकसानाची पाहणी केली त्यावेळी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक,तहसिलदार विद्यासागर चव्हाण,नरेंद्र सावरकर,राजेश सावरकर,सचिन वैद्य,विशाल साबळे,रामू राठी,शुभम ढोके, व रसुलाबादचे नागरिक उपस्थित होते.