वर्धा जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला
वर्धा: पुलगाव विक्रम सुधाकर 27 वर्ष रा. सोनोरा ढोक ता.देवळी जि. वर्धा यांने पो. स्टेला जाऊन तोंडी रिपोर्ट दिला की दिनाक. 11/07/2022 वा.चे 18/00 वा.ते. दि.12/07/2022 चे 07/00 वा. सुमारास यातील फिर्यादी यांनी त्यांचे बंड्यात शेती उपयोगी नांगर, डवरा इत्यादी वस्तु ठेवल्या होत्या, नमुद घटना ता. वेळी व स्थळी यातील फिर्यादी यांने त्यांचे बड्यात (कोठ्यात) जाऊन पाहीले तेव्हा बंड्यात ठेऊन असलेल्या लोखंडी डवरापैकी एक डवरा दिसुन आला नाही, डवरा किंमत 3100/ रु चा. माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे. अशा तोंडी रिपोर्ट वरून सदरचा पोलिसांनी गुन्हा नोंद केला
सदरचा गुन्हा पोलीस निरीक्षक श्री. शैलेश शेळके साहेब यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अमंलदार स.फौ. खुशालपंत राठोड, पो.ना. विनोद रघाटाटे, जयदीप जाधव, मुकेश वांदिले हे तपास करीत असतांना पोलिसांना मुखबिर मार्फत प्राप्त माहीती वरून आरोपी नामे योगेश अरुणराव मांढरे वय 26 वर्ष रा. सोनोरा ढोक वार्ड क्र. 02 ता. देवळी जि. वर्धा यास ताब्यात घेऊन सदर चोरी बाबत विचारपुस केले असता सदर आरोपी यांने चोरी केल्याचे सांगीतल्याने वरील वर्णनाच्या चोरीस गेलेला एक लोखंडी लांब पाईप असलेला हिरवा कलर मारुन रुमन असलेला डवरा किंमत 3100/- रु.चा.माल आरोपी कडुन हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव गोकुळसिंग पाटील यांचे मार्गदर्शनात शैलेश शेळके पोलीस निरीक्षक पो.स्टे. पुलगाव यांचे निर्देशाप्रमाणे प्रकटीकरणाचे अंमलदार स.फौ. खुशालपंत राठोड, नापोकॉ. विनोद रघाटाटे, महादेव सानप, जयदिप जाधव, मुकेश वांदिले यांनी केली आहे.