कारंजा तालुका प्रतिनिधी //धिरज कसारे
कारंजा – कारंजा येथील शिक्षक रात्री जेवण झाल्यानंतर रोजच्या प्रमाणे शतपावली करण्याकरिता बाहेर निघाले असता कारंजा मौजा गवंडी रोडवर उचके धान्य भंडाराचे समोर कारंजा कडून ढाबा कडे जाण्याऱ्या MH 32 G 0181 या वनविभागाच्या वाहनाने धडक दिली या धडकेत ते जागीच ठार झाले. हा अपघात रात्री दरम्यान ९.३० वाजताच्या सुमारास कारंजा येथे झाला यावेळी वाहन चालक मद्यप्राशन करून असल्याचे आढळून आले कारंजा ढाबा रस्त्यावर अपघात घडताच वनविभाग वाहनाचा चालक कारंजा पोलीस ठाण्यात उपस्थित झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. वनविभागाच्या वाहनावरील खासगी चालक राजू पंजाब उईके वय 28 रा.ढाबा ता कारंजा यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी त्यांच्यावर कलम 279,337,338,304(अ) भादवी सहकलम 184,134 मोवाका भोजराज आत्माराम गाखरे वय 52 रा कारंजा असे मृत शिक्षकांचे नाव आहे रात्री जेवण केल्यानंतर पत्नीसह रोज प्रमाणे शतपावली करीत होते दरम्यान वन विभागाच्या वाहनाने त्यांना धडक दिली अपघातानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालय कारंजा येथे उपचारासाठी नेण्यात आले . मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांना वाहनाने धडक दिली तेव्हा पत्नी बाजूला झाल्यामुळे त्या बचावल्या भोजराज गाखरे हे कारंजा तालुक्यातील सावळी ( खु ) येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते या अपघातप्रकरणी वाहनचालकास कारंजा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुढील तपास कारंजाचे ठाणेदार दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सचिन मानकर, मनोज सुर्यवंशी,लीलाधर उकडे, अतुल अरसड, व कारंजा पोलीस स्टेशन करीत आहेत.