नांदपुरात शासकीय साहित्य चोरी करणारे सहा आरोपीना आर्वी पोलिसांनी केले बारा तासाच्या आत जेरबंद सहा आरोपी कडून 8 लाख 91 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त

 

वर्धा: नांदपुर (धनोडी) जवळील कर्माबाद शिवारातील बाकडी नदीचे काठावर असलेल्या कोल्हापुरी बांध- ‘याच्या 45 लोखंडी प्लेटा लघु सिंचन पाठबंधा-याच्या टिनाचे शेडमध्ये कुलुप बंद करून ठेवल्या होत्या दि 25/06/2022 रोजी चे 18/00 वा ते दि 28/06/2022 रोजी चे 09/00 वा चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने टिनाचे शेडचे लॉक तोडुन आतमध्ये ठेवुन असलेल्या बांधा-याच्या 45 लोखंडी प्लेटा किंमत 2,70,000 रू च्या माल चोरून नेल्याने फिर्यादी (सरपंच) पवनकुमार श्रीधरराव गवळी रा नांदपुर यांचे तोंडी रिपोर्टवरून पो स्टे ला अप क 0603/22 कलम 461, 380 भा द वी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता
सदर गुन्हयामध्ये डी बी पथक यांना मुखबीर कडुन माहीती मिळाली की तळेगाव (शा प) ता आष्टी येथे राहणारा जसबिरसिंग बावरी हा गेली 1 महीन्यापासुन नांदपुर येथिल बाकडी नदीचे काठाने वारंवार फिरत असतांना दिसला आहे अश्या माहीतीवरून त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने तो माल त्याचे चुलत भाउ याचे मदतीने मो सा ने पोहचुन नागपुर येथील मित्राचे मदतीने चोरी करून चोरी केलेला माल त्याचे मित्र मालवाहु गाडीने नागपुर येथे घेवुन गेला असल्याचे सांगितल्याने शितापिने त्यांना ताब्यात घेवुन भंगार दुकाणदार यांने चोरीचा माल खरेदी करून जवळ असलेल्या गॅस कटर मशिन ने गलविल्याने आरोपी 1) जसिबिरसिंग मुलकसिंग बावरी, रा तळेगाव 2 ) जसविरसिंग जगीरासिंग बावरी, रा पाचपावली नागपुर 3 ) शैलेंद्रसिंग सुरजसिंग बावरी रा पाचपावली नागपुर 4 ) केवलसिंग समशेरसिंग पटवा, रा पिंपळा पुनर्वसन आर्वी 5) शुभम शंकर लाडके रा नेताजी वार्ड आर्वी 6) भंगार दुकाणदार रामआसरे रतनलाल शाहु रा कळमना नागपुर यांना अटक करून त्याचेपासुन 1अशोक लेलँड कंपनीची डोस्ट एल एस चारचाकी मालवाहु गाडी क्रमांक एम एच 49 ए टी 8261 जुनी वापरती किंमत अंदाजे – 5,00,000 रू 2 ) लोखंडी प्लेटा व लोखंडी अँगल चे तुकडे वजन 2960 किलो ग्रम एकुण किंमत 2,70,000 रू 3 ) भारत गॅस कंपनीचे जुने वापरते कमरशियल सिलेंडर 19.4 किग्रॅ वजनाचे किंमत अंदाजे 1500 रू 4) एक ऑक्सीजन सिलेंडर किंमत अंदाजे 15,000 रू 5) दोन पिवळया धातुचे गॅस रेगुलेटर जुनी वापरती किंमत सिंलेडर जुनी वापरती किंमत अंदाजे 2000 रू 6) एक कश्मिर के ओ आर कंपनीचे गॅस कटर व दोन रबरी पाईप जुनी वापरती किंमत अंदाजे 3000 रू 7) एक जुनी वापरती मो सा बजाज कंपनीची 220 पल्सर किंमत अंदाजे 1,00,000 रू असा एकुण जु कि 8,91,500 रू चा माल जप्त करून 12 तासाचे आत सदरचा गुन्हा उघडकिस आणला ही सपुंर्ण कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत होळकर सा, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत सोळंके उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंके पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांचे प्रत्यक्ष मार्गदशनात पोलिस उपनिरीक्षक हर्षल नगरकर पो-हवा रंजित जाधव, ना पो शि सुनिल मळणकर, अनिल वैद्य, सतिश नंदागवळी, किशोर साटोणे, पो शि प्रदिप दातारकर, अतुल गोटेफोडे, यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षल नगरकर व पोलीस स्टेशन आर्वी करीत आहे