नदी काठावरील गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन

वर्धा, : जिल्हयातील तीन प्रकल्प 100 टक्के व दोन प्रकल्प 90 टक्के क्षमतेने भरलेले असून जलाशयातील पाणी दरवाजे, सांडव्यावरुन वाहत असल्यामुळे नदी काठावरील गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन, पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण अधिका-यांनी केले आहे.
अमरावती जिल्हयातील मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा प्रकल्पातील दि.15 रोजी सकाळी 6 वाजता 80.25 टक्के पाणीसाठा झाला असून जलाशयाची पातळी 341.20 मी. व पाणीसाठा 452.66 दश लक्ष घन मीटर झाला आहे. दि.15 जुलै पर्यंत 338 मीमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
वर्धा जिल्हयातील कारंजा तालुक्यातील कार नदी प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा झाला असून जलाशयाची पातळी 433.10 मी. व पाणीसाठा 21.063 दश लक्ष घन मीटर झाला आहे. तर एकुण 186 मीमी पाऊसाची नोंद झाली आहे.
वर्धा तालुक्यातील रोठा -2 लघु प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा झाला असून जलाशयाची पातळी 105.60 मी. व पाणीसाठा 1.0118 दक्ष लघ घन मीटर झाला आहे. एकुण पाऊन 532 मी.मी. पाऊसाची नोंद झाली आहे. टेंभरी लघु प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा झाला असून जलाशयाची पातळी 91.80 मी. व पाणीसाठा 1.2732 दश लक्ष घन मीटर झाला आहे. एकुण पाऊस 532 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. पारगोठाण लघु प्रकल्पात 80.75 टक्के पाणीसाठा झाला असून जलाशयाची पातळी 98.48 मी. व पाणीसाठा 0.5717 दश लक्ष घन मीटर झाला आहे. एकुण 644.8 मी.मी.पावसाची नोंद झालेली आहे. असे पूर नियंत्रण कक्षाने कळविले आहे.