आरमोरी तालुका ओला दुष्काळ जाहीर करा, प्रहार नेते निखिल धार्मिक

 

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी //इशांक दाहागावकर

आरमोरी : आरमोरी तालुक्यात १० दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने चिमूर तालुक्यातील सर्व नदी नाले तळे भरगच्च भरुन वाहू लागले आहे. सतत धार – धार पावसामुळे सर्व परिसर जलमय झाला असून शेतामध्ये पावसाचे पाणी साचले आहे शेतात असलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी अधिक चिंता ग्रस्त झाला आहे .त्या करिता आरमोरी तालुका ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी नेते प्रहार जनशक्ती पक्ष गडचिरोली चे निखिल धार्मिक यांनी केले आहे.सविस्तर असे की आरमोरी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांवर आधीच दुबार पेरणीचे संकट आले असून यात अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन पेरणी करावी लागली आहे या दुबार पेरणीने अनेक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत.शिवाय त्यात अतिवृष्टी हे चित्र मात्र शेतकऱ्यांना पहावसे वाटत नाही.काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे आरमोरी तालुक्यातील नदी नाले तलाव तुडुंब भरून वाहत असल्यामुळे आरमोरी तालुक्यात पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी चक्क शेतातून वाहात असल्याने काही शेतात पाणी देखील साचून राहत आहे.त्यामुळे‌ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.यात धान सोयाबीन तुर या सारख्या पिकांची माती सह रोपटे वाहुन गेले आहे.त्यामुळे आरमोरी तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची नुसकान भरपाई देण्यात यांवी अशी मागणी समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणारे शेतकरी नेते प्रहार जनशक्ती पक्ष गडचिरोली निखिल धार्मिक यांनी केले आहे.