कारंजा तालुका प्रतिनिधी धिरज कसारे
कारंजा – रात्र भऱ्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीनाल्यानं पूर आला. यात नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कारंजा शहराला जोडणारा कारंजा माणिकवाडा रस्त्यावरील खडक नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून पुलावरून चार ते पाच फूट पाणी वाहत आहे. यामुळे सावरडोह, खापरी, सुसुंद्रा, बेलगाव, माणिकवाडा, तारासावंगा गावाचा संपर्क तुटला आहे. कारंजा द्रुगवाडा जाणारी बस पुरामुळे अडकली.पुलावरून वाहणारा पूर सहा ते सात तास उतरणार नसल्याने बस परत बस स्थानकावर गेली ..कमी उंचीचा पूल असल्याने दरवर्षी हा मार्ग अनेकदा पुरामुळे बंद पडतो यामुळे विद्यार्थी, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.शहराला जोडणारा रस्ता बंद पडल्याने विद्यार्थी आज शाळेत पोहचू शकले नाही.सावरडोह येथील पोलीस पाटील शरद ढोले हे पुलावर सकाळपासून उपस्थित होते त्यांनी पुलावरून कोणीही नागरिक व वाहतूक जाऊ नये जिवीतहानी होऊ नये यासाठी काळजी घेत प्रयत्न केलं