ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा’ – आमदार दादाराव केचे

प्रतिनिधी //उमंग शुक्ला

संततधार पाऊसामुळे आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांसह आम नागरीक त्रस्त झाले आहेत. शेतकरी शेतातील कोळपनी, डवरनी, फवारनी, खते रोपांना पुरवने यासारखी संपुर्ण काम ठप्प पडली आहे तर विविध रोग राईच्या परकोपामुळे आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी व कारंजा सह वर्धा जिल्हा रूग्णालयात रुग्णांची मोठी संख्या वाढली आहे. त्यामुळे कोरोना नंतर आलेल्या नैसर्गिक संकटाला तोंड देता देता नागरीकांच्या नाकी नऊ येत आहे असे असतांना आर्वी विधानसभा क्षेत्राचे दुरद्रष्टे आमदार दादाराव केचे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे ‘तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा’ या संदर्भात मागणी केली आहे.

उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय यांनी दिलेलेल्या प्रथमदर्शनी माहीती नुसार आर्वी येथील बाधित गावांची संख्या १६, बाधित कुटुंबाची संख्या ११, कच्ची घरे अंशंत: १०, एकुण १०, बाधित गोठ्याची संख्या १, तर शेतपिकांचे नुकसान हेक्टर ४५५ असा अहवाल दिला आहे. वाठोडा सर्कल येथील बाधित गावांची संख्या २२, बाधित कुटुंबाची संख्या १७९, मृत जणावरे मोठी २, बाधित कच्ची घरे १०, बाधित गोठ्याची संख्या ७ तर शेतपिकांचे नुकसान ५३३ इतके दाखवले आहे. वाढोणा सर्कल मधिल बाधित गावांची संख्या ३, बाधित कुटुंबाची संख्या कमी ४, बाधित कच्ची अशत: घरे ४, शेती पिकांचे नुकसान झाले १५० हेक्टर इतके झाले आहे.

विरूळ या सर्कल मध्ये बाधित गावांची संख्या ८, बाधित कुटुंबाची संख्या १६, बाधित कच्ची घरे १३, बाधित गोठ्याची संख्या ५४५ हेक्टर इतकी आहे. रोहना सर्कल मध्ये बाधित गावांची संख्या १३, बाधित कुटुंबाची संख्या ३०, बाधित कच्ची घरे अंशतः ३०, शेत पिकांचे नुकसान ३५७ हेक्टर, खरांगणा सर्कल मध्ये बाधित गावे ४, बाधित कुटुंबाची संख्या ७, बाधित घरे अंशत: ६, बाधित गोठ्याची संख्या १, शैती पिकांचे नुकसान १४० हेक्टर एवढे झाले आहे. असे एकूण आर्वी तालुक्यातील नुकसान बाधित गावांची संख्या ६६, बाधित कुटुंबांची संख्या २४७, मृत जनावरे २, कच्ची बाधित घरे अंशंत: ७३, बाधित घोड्यांची संख्या १२, शेती पिकांचे नुकसान २१८० हेक्टर एवढ्या भव्य स्वरूपात प्रदर्शिनी निदर्शनाला आले आहे हि आकडेवारी ५ ते ११ जुलै २०२२ या कालावधीतील उपविभागीय अधिकारी कार्यालय आर्वी यांनी दिली आहे.

तर आष्टी तालुक्यातील महसुल मंडळ तळेगाव यांनी दिनांक ९/७/२०२२ रोजी मुसळधार पाऊसामुळे शेतपिकांचे नुकसान अहवाल प्रथम दर्शनी असा दिला आहे की, बाधित गावांची संख्या १६, कापुस १५६ हेक्टर, सोयाबीन ९९ हेक्टर तर तुर २९ हेक्टर असे ऐकुन २८४ हेक्टर जमिनीवर पिकांचे नुकसान दाखवले आहे. वर्धा जिल्ह्यातील १५/७/२०२२ ला सकाळी १०.३८ पर्यंत आर्वी २६४.४ तर पुर्ण प्रमाण ३९२.९, वाठोडा २६४.४ तर पुर्ण प्रमाण ४०४.१, वाढोणा 264.4 तर पुर्ण प्रमाण ३२७.५, खरांगणा २६४.४ तर पुर्ण प्रमाण २०९.२, विरूळ 264.4 तर पुर्ण प्रमाण ३९९.८, रोहना २६४.४ तर पुर्ण प्रमाण ४१४.६ इतक्या पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर संपुर्ण आर्वी तालुक्यात २६४.४ तर पुर्ण प्रमाण ३५८.१ इतकी नोंद झाली आहे. तर कारंजा २३२.६ तर पुर्ण प्रमाण ३२३.२, सारवाडी २३२.६ तर पुर्ण प्रमाण ३०८.९, कन्नमवार ग्राम २३२.६ तर पुर्ण प्रमाण ३५९, ठाणेगाव २३२.६ तर पुर्ण प्रमाण ३५९ इतके आहे तर संपुर्ण कारंजा तालुक्यातील पर्जन्यमानाची नोंद 232.6 तर पुर्ण प्रमाण ३३७.८ इतकी नोंद शासकीय दस्तऐवजात आहे. आष्टी २४६.२ तर पुर्ण प्रमाण २५२.३, तळेगाव २४६.२ तर पुर्ण प्रमाण २७०.३, साहुर २४६.२ तर पुर्ण प्रमाण ३२३.७ इतकी नोंद झाली आहे. तर संपुर्ण आष्टी तालुक्यातील पर्जन्यमान २४६.२ तर पुर्ण प्रमाण २८२.३ इतकी नोंद झाली आहे.

याबाबत प्रतिक्रिया देते वेळी सांगितले की, रोजच जिथल्या कार्यकर्ते अथवा शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्यांसह मौका पाहणी करत आहे. मौका परिस्थिती पाहुन ह्रदय हेलावून टाकणारे दृष्टीस पडत शेतकऱ्यांना खरोखरच शाश्वत व आर्थिक मदतीची अत्यंत आवश्यकता आहे. काही शेतकऱ्यांनी तर दुबार, तिबार पेरनी करूनही त्यांच्या शेताचे हाल बघविले जात नाही. निसर्गाने शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न हेरावून नेले आहे करीता मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अशी मागणी करतो की, ‘ओला दुष्काळ अत्यावश्यक भागात जाहिर करावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी की, जेने करून शेतकऱ्यांच्या महनतिने हिरवे स्वप्न फुलेल.’