कारंजा तालुक्यातील कार नदी प्रकल्प ओव्हरफ्लो

 

कारंजा तालुका प्रतिनिधी// धिरज कसारे

कारंजा तालुक्यातील कार नदी प्रकल्प १००% भरलेला असून रात्रीच्या पावसामुळे कार नदी प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला आहे या प्रकल्पावरून २५ गावांना पाणी पुरवठा होतो तसेच ५ हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी या प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो कार नदी प्रकल्प १००% भरल्याने कारंजा तालुक्यातील २५ गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटलेली आहे