कारंजा शहरात बालसंस्कार व मुल्यसंस्कार शिबीर व वृक्षारोपण

 

कारंजा तालुका प्रतिनिधी // धीरज कसारे

कारंजा:- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग तर्फे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र विभाग तर्फे श 3 जुलै रोजी मुख्यसंस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबीर घेण्यात आले अध्यात्म बरोबर विद्यार्थ्यांना व सेविकाऱ्यांना गर्भसंस्कार शिशु संस्कार व बाल संस्कार मूल्य शिक्षण संस्कार ज्ञान राष्ट्रभक्ती नैतिकता व विचार चरित्र इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले नगराध्यक्ष स्वाती भिलकर, मधूमाला दुधकवरे, कमलेश भाऊ कठाणे या उपस्थित सर्व सेवेकरी बंधू-भगिनींनी यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचेचे सर्वप्रथम पूजन घेऊन ईशान्य कोपऱ्यात बेलाचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच आवळ्याचे झाड कडुलिंब इतर झाडे लावण्यात आली आहे यामध्ये 70 ते 80 बालसेविकारी मुला-मुलींनी सीडबॉल बनवले असून फुल झाडाची लागवड केली आहे सर्वांनी कृष्ण सवंगडीप्रमाणे मांदळी पद्धतीने भोजनाचा आस्वाद घेतलेला आहे यावेळी पूजाताई महिले वैशू ताई चाफले मायाताई भादे राठी ताई यांनी मुलांना नाश्त्याची नियोजन करण्यात मोलाची मदत केली आहे याप्रसंगी राजुभाऊ पेटकर निलेश भाऊ ढोले यांनी कार्यक्रम पार पाडण्यात मुलाचे योगदान केले आहे कार्यक्रमाची रूपरेषा सूत्रसंचालन मायाताई डोईजोड यांनी पार पाडले ममताताई दिवाने संगीताताई भादे, सुनीताताई भांगे प्रमिलाबाई बैंगणे यांनी मोलाची योगदान दिले आहे संगीता येते ताई चापले यांनीही योगदान दिले आहे अशा प्रकारे निसर्गाच्या सानिध्यात सेवेकरी मुला-मुलींनी मनसोक्त आनंद घेतलेला आहे