स्थानिक गुन्हे शाखा,वर्धा कडून यवतमाळ जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे २ गुन्हे उघडकीस एकूण ५०,०००/- रु. चा माल जप्त.

 

वर्धा जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला

वर्धा: दिनांक ०५-०७-२०२२ रोजी वर्धा (शहर) परिसरात पेट्रोलिंग सुरु असतांना आरोपी १) गजानन रमेशराव लसुंदे, वय २३ वर्ष, २) दुर्गेश दिपकराव कोरडे, वय २२ वर्ष, दोघेही रा. घारफळ, तह. बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ हे त्यांचे जवळील असलेल्या मोटर सायकलवर संशयास्पद फिरत असतांना मिळून आले. त्यांना सदर मोटरसायकल बाबत विचारपूस केली असता ते उडवा उडवीचे उत्तर देत असल्याने त्यांचे जवळील मोटर सायकलची तपासणी केली असता सदर दोन्ही मोटरसायकल या पोलीस स्टेशन बाभुळगाव जिल्हा यवतमाळ येथून चोरी गेल्या असल्याबाबत खालील प्रमाणे माहिती मिळाली.

दि. ०६-०१-२०२१ रोजी फिर्यादी श्री अनिकेत केशवराव साखरकर, वय २२ वर्ष, रा. निमगव्हाण तह. चांदुर (रेल्वे) जि. अमरावती हे त्यांचे जवळ असलेल्या मोटारसायकल ने यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव येथील आयटीआय कॉलेज येथे गेले असता सदर ठिकाणी ठेवलेली एक हिरोहोंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक एमएच-२७/एके-१२२९ जुनी वापरती किंमत ३०,०००/-₹ मोटारसायकल कोणीतरी अज्ञात आरोपीताने चोरी करून नेली असे फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन बाभूळगाव येथे अप.क्र. १०/२०२१ कलम ३७९ भादंवि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

• तसेच फिर्यादी अरुण नारनवरे, रा. नेताजी चौक, बाभूळगाव, जि. यवतमाळ हे बाभूळगाव दिनांक ०९ ०३-२०२२ रोजी येथील मुख्य चौकात कामानिमित्त गेले असता त्यांची हिरो कंम्पनीची स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक एमएच-२९/बीजी-५७६१ जुनी वापरती किंमत २०,०००/-₹ ही कोणीतरी अज्ञात आरोपीताने चोरी करून नेली असे फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन बाभूळगाव येथे अप.क्र. १४२ / २०२१ कलम ३७९ भादंवि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

वर नमूद दोन्ही गुन्ह्यातील मोटरसायकल आरोपी १) गजानन रमेशराव लसुंदे, वय २३ वर्ष, २) दुर्गेश दिपकराव कोरडे, वय २२ वर्ष, दोघेही रा. घारफळ, तह. बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ यांनीच चोरी करून आणून स्वत: हा वापरत असल्याचे निष्पन्न झाल्याने दोन मोटारसायकलसह एकूण किंमत ५०,०००/- रू. चा •माल आरोपीसह पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक श्री. संजय गायकवाड, सपोनि महेंद्र इंगळे यांचे निर्देशांप्रमाणे पोलीस अंमलदार हमीद शेख, दिपक जाधव, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, मनिष कांबळे यांनी केली आहे.