एटापल्ली येथील विजेची समस्या दूर करण्याकरिता माहावीतरंन ला न,प, बांधकाम सभापती यांचे निवेदन

 

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी //इशांक दहागावकर

 

एटापल्ली:निवेदनात असे म्हटले आहे की शहरातील वीज पुरवठा मागील अनेक महिन्यांपासून पाच-पाच मिनिटांनी दिवसा व रात्री खंडित होत आहे. याबाबत महावितरण कंपनीच्या कार्यालयात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. परंतु तक्रारींची दखलच महावितरण कंपनी घेत नाही. वीज पुरवठा वारंवार चालू-बंद होत असल्यामुळे अनेक महागड्या मशिनरी, वस्तूंमध्ये बिघडन्याची शक्यता नाकारता येणार नाही याचा जनतेला मनस्थाप होत आहे या कडे जाणीवपूर्वक लक्ष घालून लवकरात लवकर तोडगा काढावे तसेच विद्युत पुरवठा व्यवस्तित का होत नाही याचे कारण पत्राद्वारे कळवावे ही विनंती उपअभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी एटापल्ली ला नगर पंचायतीचे बांधकाम सभापती राघवेंद्र सुल्वावार,यांनी केला आहे

निवेदन देतांना

नगरसेवक जितेंद्र टिकले, राहुल कुळमेथे, नामदेव हिचामी आदी उपस्थित होते