स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचेकडुन घरफोडी करणा-या अट्टल गुन्हेगारास अटक  घरफोडीचे 06 गुन्हे उघडकीस

 

फिर्यादी बळवंत मारोतीराम कोहाड रा. साईनगर वर्धा हे दि.22/06/22 ते 24/06/22 दरम्यान बाहेर गावी गेले असता अज्ञात चोरट्याने त्याचे घराचे कुलूप कोंडा तोडुन घराचे आत प्रवेश करुन अंदाजे 10000/रु चोरुन नेले होते. अशा फिर्यादिचे तक्रारीवरुन पो स्टे रामनगर येथे नोद होता. तसेच पो स्टे रामनगर व वर्धा शहर परिसरात रात्रीचे घरफोडीचे प्रमाण वाढल्याने स्थानीक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनी आरोपीच्या शोधात पेट्रोलींग वाढविली.
दि.03/07/22 रोजी स्थानीक गुन्हे शाखेतील मा. पो.नी. श्री गायकवाड साहेब यांचे मार्गदर्शनाप्रमाने पोलीस उपनिरिक्षक अमोल लगड हे पथकासह चोरी व घरफोडीचे गुन्हे वारवांर होत असलेल्या भागात पेट्रोलींग करीत असतांना त्यांना एक ईसम संशयास्पद रित्या फिरतांना मिळुन आला पेट्रोलींग पथकातील कर्मचारी चंद्रकांत बुरंगे यांनी सदर ईसमास लगेच ओळखुन तो घरफोडीचा अट्टल गुन्हेगार प्रविन विनायक आक्केवार वय 54 वर्ष रा. ऐकोरी वार्ड क्र 2 चद्रपुर हा असल्याचे सांगितल्याने सदर ईसमाची सखोल विचारपूस करुन त्याचे ताब्यात असलेल्या साहित्याची पाहनी केली असता त्याचे ताब्यात घरफोडी करण्याकरीता वापरण्यात येनारे लोखंडी टाँमि, लोंखडी छन्नी, पोर्टेबल ईलेक्ट्रानीक वजन काटा व चोरी केलेल्या दागीण्याना वितळवुन तयार केलेले सोन्या चांदीचे तुकडे तसेच नगदी रोख मिळुन आल्याने पोलीसांनी त्याची सखोल चौकशी केली असता सदर आरोपी हा मागील काही महिण्यापासुन केशव सिटी, साईनगर, पिपरी मेघे अशा परिसरात रात्रदरम्यान पायदळ फिरुन बंद घराची पाहनी करुन चोरी करीत असल्याचे आरोपीने कबुल केले. तसेच त्याने हिंगणघाट शहरात सुध्दा चोरी केल्याचे त्यांने कबुल केले. आरोपीचे ताब्यातून 3 सोन्याचे तुकडे वजन अंदाजे 76 ग्राम व चांदीचे तुकडे वजन अंदाजे 156 ग्राम व नगदी 8000/रु व ईतर साहीत्य असा एकुन 3,84.980/रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीने पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत 4 घरी व पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत 2 ठिकानी घरफोडी केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीस अटक करुन पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन रामनगर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपी हा यापुर्वी घरफोडीचे गुन्ह्यामध्ये नागपुर शहर, पो स्टे वर्धा शहर, पो स्टे हिगंणघाट येथे अटक झाला असुन त्याचे विरुध्द गुन्ह्याची नोद आहे. सदर आरोपी हा सतत नागपुर शहरात निटनिटका राहतो व बसने प्रवास करुन आजुबाजुच्या शहरामध्ये जाउन दुपार दरम्यान बंद घराची पाहनी करुन रात्रदरम्यान चोरी करतो सदर आरोपी हा नेहमी निटनिटका राहत असल्याने तो चोराचा अट्टल गुन्हेगार असणार आहे असा संशय सुध्दा येत नव्हता. परंतू स्थानीक गुन्हे शाखेतील नेमनुकीस असलेल्या अमंलदारानी यापुर्वी त्यास घरफोडीचे गुन्ह्यात अटक केल्याने सदर आरोपी पुन्हा त्यांचे समोर येताच आरोपीचे पितळ उघडे पडले.
सदरची कामगीरी मा. प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, वर्धा, मा.यशवंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, श्री. पियुष जगताप, उपविभागिय पोलीस अधिकारी वर्धा, श्री.संजय गायकवाड पोलीस निरिक्षक, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, यांचे मार्गदर्शनात स्था.गु.शा.चे सपोनि महेंद्र इंगळे, पोउपनि अमोल लगड, पोउपनी बालाजी लालपालवाले, पोहवा नरेंद्र डहाके, हमीद शेख, दीपक जाधव,चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, प्रमोद पिसे, मनिष कांबळे, रामकिसन ईप्पर, पवन पन्नासे, नितीन ईटकरे, व सायबर पथक यांनी केली आहे. सदर आरोपीकडुन वर्धा जिल्ह्यातील ईतरही चोरी व घरफोडी सारखे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.