लग्नाचे आमिष देत पीडितेवर अत्याचार कंत्राटदारावर कारंजा पोलिसात गुन्हा दाखल

 

कारंजा (वा) : बावीस वर्षीय पीडित मुलीसोबत इंस्टाग्रामवर ओळख करून प्रेमसंबंध प्रस्थापित करत लग्नाचे आमिष देत पीडितेवर वारंवार अत्याचार करण्यात आला .या प्रकरणी पीडितेने कारंजा पोलिसात तक्रार दाखल करून कंत्राटदारवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडितेला लग्नाचे आमिष देत वारंवार अत्याचार करणाऱ्या आरोपीचे दीपक गजानन बैंगने अस नाव आहे. काही दिवसांपूर्वी पीडित मुलगी ही कारंजा पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेली असता तिला एक वर्षानंतर लग्न करण्याचे अमिश देत समज देऊन पोलीस ठाण्यात लेखी समझोत्याचे पत्र देऊन परत आले, मात्र त्यानंतर पीडित मुलीला आरोपीने हुलकावणी देत शहरातून पळून गेला त्यानंतर पीडित मुलगी आरोपीला फोन द्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न करत असताना टोलवाटोलवी करत असल्यामुळे पीडितेने रात्री कारंजा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. आरोपी दीपक गजानन बैंगणे याला अद्याप अटक करण्यात आली नसून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत ,उपनिरीक्षक सचिन मानकर,विनोद वानखडे, निखिल फुटाणे तपास करत आहे.