स्व. बाबासाहेब सुनकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 

कारंजा :- धिरज कसारे तालुका प्रतिनिधी

कारंजा तालुक्यातील नारा येथील अण्णासाहेब गुंडेवार विद्यालय येथे आज दिनांक ०१/०७/२०२२ रोज शुक्रवार ला स्व. बाबासाहेब सुनकर माजी सचिव तसेच उपाध्यक्ष , ग्रामीण विकास संस्था नागपूर यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त S.S.C परीक्षा मार्च २०२२ मधिल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रथम क्रमांक क्रिश धनराज डोबले याचा सत्कार ब्रिजमोहनजी टावरी यांनी केला , दृतिय क्रमांक तन्मय हरिदास ढोंगे याचा सत्कार भोने सर यांनी केला , तृतीय क्रमांक गोवर्धन हरेषजी हिंगवे याचा सत्कार भिसे सर यांनी केला शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले

तसेच ग्रामगीता जिवन विकास परिक्षा मध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार घरा घरात पोहचावे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले

यावेळी सुत्रसंचालन पेंढे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन उईके सर सर्वांचे यांनी केले यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ब्रिजमोहनजी टावरी , मुख्याध्यापक रेवसकर सर , युवराजजी गिऱ्हाळे , भोने सर , भिसे सर , रमेशराव धंडाळे , दत्तुजी गिऱ्हाळे , माजी विद्यार्थी , शिक्षक वर्ग , कर्मचारी उपस्थित होते