दीपक केदार यांना संपविण्याचा कट आलं इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांचा वर प्राणघातक हल्ला     मध्य रात्री दीपक केदार यांची गाडी अडवली

 

खबरदार न्युज नेटवर्क महाराष्ट्र

 

सविस्तर वृत्त असे की 

 

दिवसभर गंगाखेड, पालम, माजलगाव असा दौरा करून रात्री 10 वाजता सेलूला मुक्कामासाठी आलो होतो. सेलू स्तिथ हॉटेल गोविंद याठिकाणी थांबलो. काही तरी खावं म्हणून गाडी पंजाब हॉटेलकडे नेली. रायगड कॉर्नरला आधीच धब्बा धरून तिघे जण उभे होते त्यांच्या हातात दगड होते. काही क्षणातच आमच्या गाडीला ते आढवे झाले. फोनवर गाडी अडवली आहे लवकर या म्हणत दरवाज्या जवळून जोरात दगड ..मारला गोटेच्या डोक्यात तो लागला. भुरळ आल्यासारखं झालं पण गोटेनी न डगमगता गाडी पळवली. गाडी लांब आल्यावर अज्ञात स्थळी नेली.. जवळच एक गाव होतं तिथं बौद्ध वस्तीत सहारा घेतला. विनोद भोळे हॉटेलवर होते त्यांना तात्काळ पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस घेऊन येईचे सांगितले. पोलिसांना घटनास्थळी येण्यास विलंब झाला, घटनास्थळावरून एसपी ना सुद्धा कॉल केला. कार्यकर्त्याना घटनास्थळी बोलवून घेतले.

 

दोन कार आणि काही मोटर सायकल रायगड हॉटेल स्तिथ दांडे कोयते घेऊन उभा असल्याचे वाचवायला येणाऱ्या कार्यकर्त्यानी बघितले. पोलिसांच्या गाडीमध्ये बसून कार्यकर्त्यांच्या संरक्षणात आम्ही पोलीस स्टेशनला येत होतो तेंव्हा या गाड्या पुन्हा आढव्या घालण्याचा प्रयत्न

 

झाला. पोलिसांना सुद्धा हे  गुंड घाबरत नव्हते. परभणीचे खेड्य प्रकरण इत्यादी अनेक परभणीतील अनेक प्रकरणात मी भूमिका घेतली. 

 

. आमच्या हत्याचा सुनियोजित हा कट झालेला आहे. अनेक दिवसांपासून पाळत ठेवलेली दिसते.

 

सेलूत चौकातील गोविंद हॉटेलच्या आजूबाजूचे कॅमेरे तपासावेत, जिथे हल्ला झाला तेथील कॅमेरे तापासवेत व तात्काळ आरोपींना अटक केली पाहिजे. मला रोखण्यासाठी माझी हत्या करण्यासाठी हा हल्ला झालेला आहे अशे केदार यांनी म्हटले आहे