भारतीय सिमेंट मजदूर संघाची दालमिया सिमेंट कंपनी प्रशासनासोबत बैठक संपन्न, विविध विषयांवर चर्चा

 

चंद्रपुर( राजु वानखेडे: उपसंपादक)

भारतीय सिमेंट मजदूर संघाची नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनी प्रशासनासोबत गडचांदूर येथे (दि.24) ला बैठक संपन्न झाली.
यावेळी कंपनीचे युनिट हेड सुनील भुसारी, मानव संसाधन प्रमुख उमेश कोल्हटकर, व्यावसाईक प्रमुख गिरीश सोमाणी, पराग पाम्पट्टीवर, भारतीय मजदूर संघाचे नेते ॲड. शैलेश मुंजे, अनिल बंडीवार, किशोर राहुड, मनोहर साळवे, आशिष ताजने, रामरूप कश्यप, सुनील टोंगे, प्रवीण शेंडे, राजू गोहणे उपस्थित होते.
सदर बैठकीत स्थानिक युवकांना कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध करून देने, जुन्या 306 कामगारांपैकी 85 कामगारांना 0&M मध्ये नोकरी दिली आहे, 41 स्थायी कामगारांचे नियुक्ती पत्र तयार असून त्यांना टप्या टप्याने कामावर घेऊ, यात जुन्या कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन कंपणी प्रशासनाने दिले. तसेच भारतीय सिमेंट मजदूर संघाचे एक नोंदणीकृत संघटन मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असून नो. क्र. 3616 हा आहे तरी काही लोक आम्हीच भारतीय सिमेंट मजदूर संघाशी संलग्न आहोत असे सांगत कंपनी प्रशासन व कामगारांची दिशाभूल करीत होते. त्यावर भा.म.स.चे प्रदेश अध्यक्ष यांनी स्वतः पत्राद्वारे मे महिन्यात तसा खुलासा केला, त्यामुळे अश्या लोकांपासून सावध राहून भारतीय मजदूर संघाच्या नावावर दिशा भूल करणा-यांवर विश्वास ठेवू नका असे ॲड. शैलेश मुंजे यांनी प्रशासनाला सांगितले.