प्रशासकीय अधिकाऱ्याला धमकी देणाऱ्या मुल पंचायत समिती सभापतीला पदावरून हटवा:- राजु झोडे धमकीवजा पत्र पाठवणाऱ्या मूल पंचायत समिती सभापती विरोधात वंचितचे तीव्र निदर्शने

 

चंद्रपुर( राजु वानखेडे: उपसंपादक)

मूल पंचायत समितीचे सभापती यांनी शासकीय कामात अडथळा आणत धमकीवजा पत्र पाठवून बेंबाळचे ग्राम विकास अधिकारी श्री. सुखदेवे व विद्यमान सरपंच यांचेवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला. याची योग्य व निष्पक्ष चौकशी करण्यासंबंधी वंचित बहुजन आघाडी द्वारा पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र निदर्शने व नारेबाजी करण्यात आली.
पंचायत समिती सभापती मूल यांचेवर प्रशासकीय स्तरावरून कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई न केल्यामुळे व धमकीवजा पत्राची उच्चस्तरीय चौकशी करून विद्यमान सभापती यांना पदावरून पायउतार न केल्यामुळे दिनांक २७ /०७/२०२१ मंगळवारला वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक राजुभाऊ झोडे यांच्या नेतृत्वात पंचायत समिती मुल कार्यालयासमोर तीव्र नारेबाजी करत आंदोलनं करण्यात आले. पंचायत समिती सभापती हे नेहमी प्रशासकीय कर्मचाऱ्यांना धमकावून व दबावाच्या राजकारणातून कामे करून घेतात असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी दहशतीत असून धमकावणाऱ्या व राजकीय दबाव आणणाऱ्या पंचायत समिती मुल सभापती यांना धमकीवजा पत्राची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी तात्काळ त्यांना पदावरून हटविण्यात यावे या मागणी करता निदर्शने करण्यात आली.
जर सभापती यांना तात्काळ पदावरून हटविण्यात आले नाही तर वंचित बहुजन आघाडी यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असा इशारा निवेदनाद्वारे मार्फत देण्यात आला.
सदर आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक राजू झोडे, रोहित बोबाटे, मधुकर गेडाम, सुरज टिकले, मधुकरजी उराडे, सुजित खोब्रागडे, संजय गेडाम, डॉ. प्रफुल वाळके, दिलीप वाळके, लवसन वाढई, चांगदेव केमेकर कथा वंचीतचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.