इंदाराम येथे खावटी अनुदान योजने अंतर्गत अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे किट् वाटप जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते किट्स वाटप

 

विशेष प्रतिनिधी / / पूजा दब्बा

 

राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या खावटी अनुदान योजनेच्या माध्यमातून इंदाराम येथे

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते 237 लाभार्थ्यांना अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे किट् वाटप करण्यात आले.

कोरोना महामारी प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे,अनुसुचित जमातीच्या कुटुंबियांसमोर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होऊन उपासमारीची वेळ आल्याने शासनाने अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना खावटी अनुदान योजने अंतर्गत अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे अनुदान स्वरुपात वाटप करण्याचे निर्णय घेतला आहे.त्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्ष अजय  कंकडालवार यांच्या हस्ते इंदाराम येथे अनुसूचित जमातीच्या 237

लाभार्थ्यांना आदिवासी विभागांतर्गत खावटी अनुदान योजनेतुन अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, ग्राम पचायंत सरपंच सौ वर्षाताई पेंदाम, उपसरपंच वैभव

कंकडालवार,बबिता आत्राम,प्रल्हाद पेंदाम,सुर्यप्रकाश पेंदाम गंगाराम पेंदाम लालु मडावी रोशन सामलवार लक्ष्मण आत्राम व लाभार्थी उपस्थित होते