वैनगंगा .गोसेखुर्द धरणं. चीचडोह बॅरेज वर्धा नदी .प्राणहिता. गोदावरी . इंद्रावती. पर्लकोटा. येथील पूरस्थिती बाबत संक्षिप्त अहवाल

 

      विशेष प्रतिनिधी / / पूजा दब्बा

दिनांक : 24.07.2021, सायंकाळी-7.00 वाजता
1. वैनगंगा नदी:
गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 19 गेट 0.5 मीटर ने उघडलेले असुन विसर्ग 2250 क्युमेक्स आहे.

उर्ध्व भागात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे विसर्ग 4000 ते 5000 क्युमेक्स पर्यंत वाढविण्यात येणार असल्याने नदीकाठावरील गावातील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी.

चिचडोह बॅरेज चे 38 पैकी 38 गेट उघडलेले असुन विसर्ग 4500 क्युमेक्स आहे.
वैनगंगा नदीची पाणी पातळी पवनी, वडसा, वाघोली व आष्टी सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे.

2. वर्धा नदी:
निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी 3 गेट उघडण्यात आलेले असुन विसर्ग 80 क्युमेक्स आहे.
वर्धा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीची पाणी पातळी वाढलेली आहे. सद्य:स्थितीत बामणी (बल्हारशा) व सिरपूर सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.

3. प्राणहिता नदी :
प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नदीची पाणी पातळी वाढलेली आहे. सद्य:स्थितीत नदीची पाणी पातळी महागांव व टेकरा सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे.

4. गोदावरी नदी
सायंकाळी 7.00 वाजताच्या नोंदीनुसार मेडीगड्डा बॅरेज चे 85 पैकी 79 गेट उघडलेले असुन विसर्ग 26320 क्युमेक्स (9,29,500 क्युसेक्स) आहे. नदी काठावरील गावातील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी.

गोदावरी नदीची पाणी पातळी कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील सायंकाळी 6.00 वाजताच्या नोंदीनुसार कमी होत असुन इशारा पातळीच्या खाली आलेली आहे.

5. इंद्रावती नदी:
इंद्रावती नदीची पाणी पातळी जगदलपूर, चिंदनार व पाथागुडम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार * सामान्य असुन इशारा पातळीच्या खाली आहे.

पर्लकोटा

नदीची पाणी पातळी भामरागड सरीता मापन केंद्रावरील सायंकाळी 5.30 वाजताच्या नोंदीनुसार पूलाच्या 2.20 मीटर ने खाली आहे.