जनता शिक्षक महासंघ गोंदियाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचा सत्कार

 

चंद्रपुर( राजु वानखेडे: उपसंपादक)

दिनांक 22 जुलै वार गुरुवारला जनता शिक्षक महासंघ गोंदियाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जनता शिक्षक महासंघ जिल्हाध्यक्ष लक्ष्मण आंधळे, भाजप शिक्षक आघाडी राज्य सदस्य अरुणजी पारधी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शिवाजी बडे, उपाध्यक्ष गोपीनाथ ठुले तसेच पारधी सर इत्यादी उपस्थित होते. यावेळी शिक्षकांच्या मुद्द्यावर व सध्या कोरोना परिस्थिती मधील शाळा स्थितीवर चर्चा करण्यात आली. यावेळी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी शिक्षकांना चांगल्या प्रकारे काम करण्याचा सल्ला दिला.