महाराष्ट्र पीपीआय (डे)चे लिगल सेल चे अध्यक्ष एड्. अभिमान हाके-पाटील तर महासचिव वैशाली टोंगे यांची निवड

चंद्रपुर( राजु वानखेडे: उपसंपादक)

लिगल सेल (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया-डेमोक्रॅटिक ) ची सर्व वकील यांची ऑनलाईन वेबिनार मिटिंग मा. एड्. डॉ. के. एस. चव्हाण, अधिवक्ता सुप्रीम कोर्ट व राष्ट्रीय उपाध्यक्ष पीपीआय(डे) यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. या प्रसंगी मा. बि. डी. बोरकर, राष्ट्रीय अध्यक्ष पीपीआय(डे), तथा मा. हरिष सहारे राष्ट्रीय वित्त सचिव, पीपीआय(डे) आणि राष्ट्रीय कार्यकारिणी चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. विविध बारा राज्याच्या कार्यकारणीस मान्यता देण्यात आली. त्यात महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी याप्रमाणे,
अध्यक्ष: मा. एड्. अभिमान हेके-पाटील, अधिवक्ता हायकोर्ट, बेंच मुंबई. महासचिव: मा. वैशाली टोंगे-कवाडे. चंद्रपूर
उपाध्यक्ष: एड्. एस. डी. रोकडे पुणे. एड्. राजाराम बनसोडे, NEC. यांची घोषणा करण्यात आली. या प्रसंगी मा. बि. डी. बोरकर म्हणाले की पार्टी ला लिगल सेल महत्वाचा असुन समाजातील सामान्य लोक आणि त्यांच्या संवैधानिक संरक्षणासाठी लिगल सेलची महत्त्वाचा भुमिका असतो. मूलनिवासी समाजातील लोकांवरील अन्यायास यामधुन संघर्षाची भुमिका ठेवता येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की ,10 डॉक्टर, 20 इंजिनिअर व 30 वकील ज्या समाजात असतील त्या समाजा कडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणी हिंमत करणार नाही. याची आठवण करन देत पुढे म्हणाले की आज तर हजारो च्या संख्येने डॉक्टर, वकील, इंजिनिअर असतांना ही हा समाज लाचार कां? याचा अर्थ असा की या लोकांनी आपले दाईत्व पार पाडले नाही. या भुमिकेतुन पीपीआय (डे) चा लिगल सेल महत्वाची भुमिका वठविणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. संचालन व आभार मा. खुशाल रंगारी, कार्यालयीन सचिव यांनी मानले. अशी माहिती मू. एम. टी. साव सर यांनी दिली आहे.