तीर्थक्षेत्र ” वढा ” च्या विकासासाठी पाच कोटींचा निधी देणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

 

चंद्रपुर ( राजु वानखेडे: उपसंपादक)

पौराणिक ऐतिहासिक पवित्र असे वर्धा नदीच्या तीरावर व तिहेरी संगमावर वसलेले तीर्थक्षेत्र असलेल्या वढा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विठ्ठल – रुखमणीचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.

राज्यातील व जिल्ह्यातील नागरिकांचे भले व्हावे कोरोना पासून राज्यातील व देशातील जनतेची मुक्तता व्हावी अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी केली. व पवित्र अश्या वढा तीर्थक्षेत्राचा संपूर्ण व सर्वांगीण विकासासाठी आपण पांच कोटी रुपये देणार अशी घोषणा केली.
याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, दिनेश पाटील चोखारे, घुग्घुस शहर अध्यक्ष राजुरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.