अहेरी तालुका काँग्रेस तर्फे इंधन जीवनावश्यक वस्तू दर वाढीच्या विरोधात आलापल्ली येथे सायकल रॅली काढुन निषेध 

 

 

प्रतिनिधी // दीक्षा झाडे

अहेरी : केंद्र शाशनाच्या पेट्रोल डिझेल व घरघुती गॅस वाढीविरोधात आज अहेरी तालुका काँग्रेस तर्फे आलापल्ली येथे सायकल रॅली काढण्यात आली गॅस सिलेंडर चे भाव तसेच पेट्रोल-डिझेल, दिवसेंदिवस वाढणारे भाव. हे सर्वसामान्यांना न परवडणारे असे आहे. केंद्र सरकारच्या जिवनावश्यक वस्तुच्या भाववाढीमुळे सामान्य जनतेचे आयुष्य जिवन फारच बिकट कठीण होत आहे  हे यातून दिसत आहे.

सर्वसामान्यांना परवडणाऱ्या गोष्टी यावर केंद्र सरकार ने जाणीवपुर्वक लक्ष देऊन वस्तूंचे भाव दरवाढ राेखली पाहीजे.या करिता निषेध म्हणून आज आलापल्ली येथे सायकल रॅली काढण्यात आली या आंदोलनाचे नेतृत्व नामदेव उसेंडी अध्यक्ष गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी व अहेरी तालुका काँग्रेस चे अध्यक्ष मुश्ताक हकीम व यु.कॉ. चे अध्यक्ष राजाकखान पठाण यांनी केले व या आंदोलनात पंकज गुड्डेवार .रवींद्र शाह. सतीश मडावी . राजू वड्डे . जयराम मडावी. आदी कार्यकर्ते व पधाधिकारी उपस्थित होते