वनपरिक्षेत्र अधिकार राठोड यांच्या कार्यकाळातील झालेल्या कामकाजाची व आथिर्क व्यवहाराची उच्च स्थरिय चौकशी समिती मार्फत सखोल चौकशी करा ;सचिन मोतकुरवर व अन्य यांची मागणी

 

    प्रतिनिधी / / दीक्षा झाडे

एटापल्ली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजू दास राठोड हे मागील तीन वर्षापासून एटापल्ली परिक्षेत्राचा कार्यभार सांभाळल्यापासून अनेक अवैद्य कृत्य व भ्रष्टाचार करत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. दिनांक 10 मार्च 2021 ला संजू दास राठोड यांनी आपल्या परिक्षेत्रातून अवैधरित्या आईसर ट्रक मधून स्वतःच्या वापरण्यासाठी चामोर्शी येथे नेत होते. सदर माहिती आलापल्ली वनविभाग येथील तपासणी नाका घोट येथील कर्मचाऱ्यांना मिळाली आणि वन कर्मचाऱ्यांचा चमू संजय दास राठोड यांचा अवैद्य ट्रक पकडण्यास हजर असल्याचे सुगावा वनपरिक्षेत्र अधिकारी संजू दास राठोड यांना लागल्याने त्यांनी हा अवैद्य सागवानने भरलेला मुद्देमाल अर्ध्यातून परत आणला आणि एटापल्ली परिक्षेत्रातील जंगलात लपवून ठेवला आणि तपासणी होऊन कार्यवाही होईल या भीतीने ट्रक भर सागवान जंगलात मजुरांच्या मदतीने जाळपोळ करून याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच एटापल्ली परिक्षेत्रात मोहफुले गोळा करण्याकरिता ग्रीन नेटचा पुरवठा करण्यात आलेला होता परंतु सदर वनपरिक्षेत्र अधिकारी संजू दास राठोड यांनी सदर ग्रीन नेट परिक्षेत्रात वाटप न करता विक्रीच्या उद्देशाने स्वतःजवळ आज पर्यंत दाबून ठेवले असल्याची माहिती मिळाली असून वन वणवा विजवण्यासाठी विभागीय कार्यालयातून ब्लोअर मशीन मध्ये पेट्रोल टाकून जंगलात लागलेला वणवा विजवण्यासाठी पुरवठा केलेला निधी कर्मचाऱ्यांना पेट्रोल खरेदी करून न देता तो निधी स्वतः वापर केला व कर्मचाऱ्यांकडून दबावाने रजिस्टरवर सही करून घेतल्या तसेच संयुक्त वनव्यवस्थापन समिती जीवनगटा येथील लोकांच्या मनोरंजना करीता समितीच्या रकमेतून खरेदी केलेली टीव्ही समितीला न देता स्वतः वापर करत असल्याचेही समजून आले आहे. तसेच समितीकडून खरेदी केलेले एलपीजी गॅस सिलेंडर मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेले नसल्याचेही निष्पन्न झाले असून या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या विरोधात उपवनसंरक्षक भामरागड श्री आशिष पांडे यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली असून या भ्रष्ट अधिकाऱ्यावर आता काय कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कारवाही न झाल्यास आंदोलन करण्यात येणार असा इशारा श्री सचिन मोतकुरवार, श्री सुरज जककुलवार ,श्री किशोर चंकापुरे, श्री स्वानंद मडावी, श्री आकाश तेलकुंठलवार भारतीय जन संसद चे कार्यकर्त्यांनी दिला आहे व जो पर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत बदली करण्यात येऊ नये असे सुध्दा निवेदनातुन सांगण्यात आले आहे