बल्लारपूर तालुक्यातील जुनी दहेलित कोवीड लस घेण्यासाठी गर्दी

100 लसीचाच स्टाक असल्याने दुसऱ्यांदा लस घेणारे लसी पासून वंचीत
नागरिकात असंतोष,सम्बधीत विभागानी लस घेन्यासाठी झालेली गर्दी कमी करण्यासाठी कसलीच व्यवस्था केली नाही

चंद्रपुर ( राजू वानखेडे: उपसंपादक)

दिनांक: 12 जून ला व्यक्सीन घेण्यासाठी बल्लारपूर तालुक्यातील जुनी दहेली येथे स्थानीय जिल्हा परिषद प्रायमरी शाळेत लस घेण्याची व्यवस्था केली होती। परन्तु सदर लसीकरण केंद्रात लस घेणाऱ्या नागरिकानी कसल्याच सामाजिक अंतराचे पालन न करता, डाटीवाटीने नागरिक एकत्र येऊन लस घेतांना दिसले।
सदर गर्दीत एखादा कोविड रुग्ण असल्यास करोना पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो।या बाबत गावातील नागरिकांत असंतोष निर्माण होत
असून, सम्बधीत विभागाने उचित निर्देश देण्याची मागणी गावातील नागरीकांद्वारे करण्यात येत आहे।