अतिदुर्गम नेलगुंडा गावात जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा दौरा जिल्हा परिषद अध्यक्षांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

 

प्रतिनिधी / / दीक्षा झाडे

भामरागड तालुक्यातील अति दुर्गम म्हणून ओडखले जाणारे नेलगुंडा या गावाला जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी दिली भेट या भेटी दरम्यान नेलगुंडा परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या स्वातंत्र्याच्या ७२ वर्षा नंतरही या भागाचे विकास झाले नाही या भागात अनेक समस्या येथील नागरिकांना सामना करावा लागत आहे या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही वीज नाहीत पावसाड्यात नदी नाले भरले की पुलीया नाही पावसाड्यात नेलगुंडा परिसरातील लोकांचा संपर्क मुख्यालयाशी पूर्ण पने तुटतो आरोग्या वर खूप मोठे परिणाम पडतात कुठे तरी लोकप्रतीनिधी दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले व अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत आहे

व नागरिकांसोबत एक तास अध्यक्षांनी चर्चा केली व समस्या ऐकून घेतले व निराकरण करून देण्याची ग्वाही देत म्हणाले या भागात अनेक समस्या आहेत नुसता निवडणुकीच्या वेळी अनेकांकडून आश्वासन दिले जाते मात्र ते पूर्ण करत नाहीत आपण या क्षेत्रातून निवडून आलो नसलो तरी मी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या नात्याने या भागातील समस्या प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न करू असे सांगताच नागरिकानि समाधान व्यक्त केलं या वेळी देवाजी पल्लो उपसरपंच नेलगुंडा , निलेश वेलादी , सरपंच मेडपल्ली ,सुधाकर तिम्मा माजी सरपंच नेलगुंडा, साधू मडावी, मंजा कंनाके , मालू वरसे ,पांडुरंग आत्राम ,सायबी माहाका ,लालसू माहाका ,मासू वड्डे, चुक्कु माहाका ,कुमा वेलदा ,लचु वाचामी ,तास3च गावातील बहुसंख्य नागरिक उपस्तिथ होते