केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल व डिझेलच्या दर वाढी निषेधार्थ काँग्रेस तर्फे सायकल रॅलीचे आयोजन

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल व डिझेलच्या दर वाढी निषेधार्थ प्रदेश काँग्रेस तर्फे दीलेल्या आदेशानुसार व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री विजय वडेट्टीवार साहेब, चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेचे खासदार श्री सूरेश धानोरकर साहेब ( बाळु भाऊ) व चंद्रपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश देवतळे साहेब यांच्या मार्गदर्शनात बल्लारपुर शहर काँग्रेस कमिटी तर्फे शनिवार दिनांक १०/०७/२०२१ ला काटा गेट डब्लू सी एल इथून कोतपल्लीवार पेट्रोल पंप पर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. साईकल रॅलीच्या दरम्यान केंद्र सरकार च्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. पेट्रोल पंप वर येणार्‍या ग्राहकांना पेट्रोल ने शंभरी पार केल्या बद्दल पुष्प व मास्क देण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सदस्या डॉ रजनी ताई हजारे, श्री घनश्याम मूलचंदानी जी, बल्लारपुर शहर काँग्रेस चे अध्यक्ष अब्दुल करीम जी, महीला तालुका अध्यक्षा अफसाना सय्यद, महीला शहर अध्यक्षा अॅड मेघा भाले, नगर सेवक भास्कर माकोडे, नगर सेवक पवन मेश्राम, दीलीप माकोडे जी, छाया मडावी, माजी गटनेता देवेंद्र आर्या, ईस्माइल ढाकवाला, नरसिंग रेब्बावार, डेवीड काम्पेल्ली, राजू बहूरीया, नरेश गूंडापल्ली, दौलत बूंदेल, कासीम शेख, नागेश मेडार, अजय दूपारे, मोहम्मद फारुक, हरिष पवार, महेश जिवतोडे, बाबू भाई, सादीक, राकेश मूलचंदानी, करण कामटे, अयान शेख, रेहान शेख आदी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.