गोटूल बांधकामासाठी सामूहिक वनहक्क दावा मंजूर करावे जिल्हापरिषद माजी अध्यक्षा सौ.भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर)यांची मागणी सिरोंचा तहसील कार्यालय येथे तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन  

 

विशेष प्रतिनिधी / / पूजा दब्बा

सिरोंचा:-आदिवासी समाजास न्याय मिळवून देण्यासाठी काल जिल्हापरिषद माजी अध्यक्षा सौ.भाग्यश्रीताई आत्राम यांनी अदिवासी गोंडवाना गोटूल समितीच्या सदस्यांसोबत चर्चा केल्या त्याविषयावर सविस्तर माहिती घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी समिती सोबत तहसीलदार मार्फत सन्मानीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले.
विशेषतः गोटूल बांधकामासाठी अदिवासी समाजासाठी पुरेसा जागा देण्यात यावी अशी मागणी भाग्यश्रीताईंनी केली.आदिवासी धर्मात एकात्मता टिकवनारे १८५७ चे स्वाधिनता शाहिद वीर बाबूराव शेडमाके,बिरसामुंडा यांचे स्मारक,सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमासाठी सिरोंचा येथे आदिवासी गोंडवाना गोठूल बांधकामासाठी सर्व्हे क्रं७१/१ १:००हेक्टर जागा अतिक्रमण करण्यात आला असेही सांगण्यात आलं
डीसीएफ यांच्या आदेशानुसार या जागेवर रोपवाटीका तयार करण्यासाठी खड्यांचे खोदकाम सुरू करण्यात आले.तात्काळ ही कामे थांबवून सदर निवेदनाची विचारविनिमय करून गोटूल बांधकामासाठी आदिवासी समाजास जागा उपलब्ध करून यावे अशी मागणी मा.माजी जिल्हापरिषद अध्यक्षा सौ.भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर) यांनी केली आहे.
यावेळी उपस्थित तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री.मधुकर कोल्लूरी,माजी नगरसेवक रविभाऊ राल्लाबंडीवार,तालुका महिला अध्यक्ष सौ.मनीषा रवी चल्लावार, रा.क. पा. श्री समय्या कुळमेथे,देवय्या येनगंदुला युवक जिल्हा उपाध्यक्ष , तालुका उपाध्यक्ष सय्यद सलाम सत्तार रा.क.पा.मदनय्या पोचम मादेशी कोषाध्यक्ष रा.क.पा.महिला शहर अध्यक्षा सपना मुरकुटे, हसिना दामोधर पोटाला, मनिषा इंगली.कार्तिक मेश्राम
आदी होते.