महिला सक्षम झाल्या तर घर, वार्ड, समाज, गाव व देश सक्षम होईल : रवि शिंदे  भद्रावतीत महिला बचतगट कर्ज वितरण व महिला मार्गदर्शनपर मेळावा संपन्न  महिलांमधे कोविड-१९ विषयी जागृतीपर मार्गदर्शन

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

 

महिला सक्षम झाल्या तर घर सक्षम होईल, घर सक्षम झाले तर समाज सक्षम होईल, समाज सक्षम झाला तरच गाव व पर्यायाने देश सक्षम होईल. त्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून सूक्ष्म अर्थकारण करुन प्रत्येक महिलेने आर्थीक संपन्नता निर्माण करावी, असे सांगत प्रामुख्याने महिलांनी कोरोना योध्दा बणून कोरोना मुक्त प्रत्येक वार्ड व गाव करावे असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विदयमान संचालक रवि शिंदे यांनी केले.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंद्रपूर तर्फे नाबार्ड पुरस्कृत वित्तीय व डीजीटल साक्षरता शिबिर अंतर्गत महिला बचतगट कर्ज वितरण व महिला मार्गदर्शन मेळावा आज (दि.६) ला स्थानिक श्री मंगल कार्यालय, भद्रावती येथे पार पडला. पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की कोरोनाकाळात मी आरोग्य सेवक म्हणुन काम करीत आहो, त्यामुळे कोणालाही काही मदत लागल्यास मला आवाज दया, मी जमेल ती मदत नक्की करेन, अशी ग्वाही रवि शिंदे यांनी यावेळी दिली व महिलांमधे कोविड-१९ विषयी जागृतीपर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विदयमान संचालक रवि शिंदे, संचालक डॉ. विजय देवतळे, नागरी सह.पत. मर्या., भद्रावतीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, सामाजिक कार्यकर्ता वसंता मानकर, प्रा. ललित मोटघरे, प्रेमदास आस्वले, जेष्ठ नागरीक संघाचे कुटेमाटे गुरुजी, कौरासे गुरुजी, लेडांगे, राजुभाऊ पारखी, अजित फाळके, वांढरे, जोगी, आदी उपस्थित होते.
यावेळी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सहा बचतगटांना ९ लाखांचे कर्ज वितरीत करण्यात आले.
शारदा महिला बचत गट, कुनाडा, दुर्गा महिला बचत गट, कुनाडा, सावित्री महिला बचत गट, कुनाडा, सरस्वती महिला बचत गट, कुनाडा, रेणुका महिला बचत गट, कुनाडा, लक्ष्मी महिला बचत गट, कुनाडा या बचतगटांचा कर्ज वितरणात समावेश आहे.
शेवटी रवि शिंदे यांनी बँकेतर्फे सुरु असलेल्या विविध योजनांची माहीती उपस्थितांना दिली. शेकडोच्या संख्येने महिला व नागरीक कार्यक्रमात उपस्थित होते.