शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागन्या संदर्भात शिक्षकांचे काळ्या फिती लावून एक दिवसाचे आंदोलन

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

आज दिनांक: 05/07/2021 रोजी शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागन्या संदर्भात शिक्षकांनी काळ्या फिती लावून एक दिवसाचे आंदोलन केले.
निवेदन मान. मुख्यमंत्री, मान. उपमुख्यमंत्री, मान. शिक्षणमंत्री, मान. शिक्षण सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग सर्व महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-32 यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर जिल्हा ग्रामीण तर्फे चंद्रपूर उपशिक्षणाधिकारी माननीय पुनम मस्के मॅडम यांचे मार्फत पाठविन्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा अध्यक्ष मधुकर मुप्पीडवार, जिल्हा कार्यवाह रामदास गिरडकर, कान्व्हेट विभाग प्रमुख विवेक आंबेकर , चंद्रपूर तालुका अध्यक्ष देविदास चवले, सावरकर सर, विनायक कावडकर, निलकुमार पेचे, मुख्याध्यापक वाडगुरे सर इत्यादी उपस्थित होते.