सत्र: २०२०-२१-२२ मधील खाजगी शाळांची शैक्षणिक फी माफ करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी शैक्षणिक फी माफ न झाल्यास तीव्र आंदोलन:- राजु झोडे

 

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

मागील दोन वर्षीपासून कोरोना महामारीमुळे‌ सर्व शाळा महाविद्यालये बंद आहेत. कोरोनामुळे सर्वसामान्य जनतेच्या हाताला काम नसल्यामुळे पालकवर्ग आर्थिक डबघाईस आलेला आहे. अशा या महामारीच्या काळात खाजगी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक शुल्क च्या नावाने आर्थिक वसुली करत आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना धमकावून तुमच्या मुलांना परीक्षेला बसू देणार नाही असे सांगून फी वसूल करण्याचे काम करत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून विद्यार्थी शाळेत जात नसताना पालकांकडून अवैद्य फी वसुलीचे काम बंद करून संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, या मागणीला घेऊन वंचित बहुजन आघाडी द्वारा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
कोरोना काळात दोन वर्षापासून शाळा बंद असून शाळांना कोणत्याही प्रकारचा खर्च नाही तरीसुद्धा खाजगी शाळा फी च्या नावाने पालकांना नेहमी त्रास देत असतात.शाळांनी कोणत्याही प्रकारची सेवा पुरवली नसताना पालकांनी फी देण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त ऑनलाइन क्लासेसच्या नावाने संपूर्ण फी घेणे हे चुकीचे आहे. खाजगी शाळांनी अवैद्य शुल्काच्या नावाने पालकांची फसवणूक करू नये व तात्काळ पूर्ण फी माफ करावी याकरिता वंचित बहुजन आघाडी द्वारा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
सत्र: २०२०-२१-२२ या सत्रातील संपूर्ण फी खाजगी शाळांकडून माफ करण्यात आली नाही, तर वंचित बहुजन आघाडी द्वारा या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित चे नेते राजू झोडे यांनी प्रशासनाला दिला. निवेदन देतांना वंचित चे नेते राजू झोडे, जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे, शहरअध्यक्ष बंडू ढेंगरे महिलाजिल्हा अध्यक्ष कविताताई गौरकर, शहरअध्यक्ष तनुजाताई रायपूरे, लताताई साव, रामजी जुनघरे, अविकान्त नरळ, प्रमोद रणदिवे, सोनू भुक्क्या, कृष्णा पेरकावार, ईसरायल चेपूवार सहित असंख्य पालक ,कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.