रोटरी डिस्ट्रिक्ट 3030चे नवीन प्रांतपाल रमेश मेहेर यांचा पदग्रहण सोहळा ऑनलाईन संपन्न

 

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या प्रांतपाल पदाची सूत्रे माजी प्रांतपाल शब्बीर शकिर यांच्याकडून रोटेरियन रमेश मेहेर यांनी शनिवारी स्वीकारली. रोटरी वर्ष २०२१- २२ करीता प्रांतपाल होत असतांना या ऑनलाईन सोहळ्यास रोटरी इंटरनॅशनलचे डायरेक्टर रोटेरियन ए. एस व्यंकटेश हे प्रमुख अतिथी होते.
या सोहळ्यास मंचावर माजी प्रांतपाल शब्बीर शकिर, डिस्ट्रिक्ट ३०३० चे ट्रेनर राजीव शर्मा, डीजीइ आनंद झुणझुणवाला, डीजीएन आशा वेणूगोपाल, रोटे. विनिता व्यंकटेश, फर्स्ट लेडी शारदा मेहेर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी विजय तिजारे, क्लब प्रेसिडेंट प्रदीप पछाडे, क्लब सेक्रेटरी मनोज केंगे आदी उपस्थित होते.

नवीन रोटरी वर्षाच्या सुरवातीलाच TRF ला राजीव शर्मा यांनी $250000, माजी प्रांतपाल किशोर केडिया यांनी $30000, रोट डिजिएन आशा वेणुगोपाल यांनी $25000,
रोटरी नाशिक क्लबचे माजी अध्यक्ष उदय पटवर्धन यांनी $30000 डॉलरची देणगी दिली.
माजी प्रांतपाल शब्बीर शकिर यांनी वर्ष २०२०-२१ करीता सर्व क्लबनी राबविलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक करून प्रांतपाल रमेश मेहेर यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, डिस्ट्रिक्ट ट्रेनर राजीव शर्मा यांनी डिस्ट्रिक्टच्या विविध क्लबला कामकाजाची दिशा दिली. डिस्ट्रिक्ट 3030 चे कामकाज त्यातील क्लबच्या सहभागाबद्दल आणि सामाजिक उपक्रमांचे रोटरी इंटरनॅशनल डिरेक्टर व्यंकटेश यांनी समाधान व्यक्त करून जास्तीतजास्त लोकांना रोटरी या सामाजिक संस्थेत समाविष्ट करून घेण्याचे आवाहन केले.
नवीन पदभार स्वीकारल्यावर आपल्या मनोगतात प्रांतपाल रमेश मेहेर यांनी डिस्ट्रिक्ट ३०३० मधील प्रत्येक क्लब हे माझे कुटुंब असून सामाजिक चळवळ ही प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहचविण्याची सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले या वर्षांतील ठरविलेली लक्ष हे महिला सबलीकरण, शेतकरी, पोलिओ आणि सध्याच्या कोरोना विषाणूत गरजू रूग्णांना मदत करणे आहे असे मांडले या मनोगतात प्रांतपाल रमेश मेहेर यांनी त्यांची टीम देखील जाहीर केली. हा संपूर्ण सोहळा झुमवर आयोजित करण्यात आला या ६०० सभासदांनी सहभाग नोंदवून रोटरी इंटरनॅशनलचे नूतन अध्यक्ष शेखर मेहता यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याचे सूत्रसंचालन रोटेरियन मनिषा विसपुते व रोटेरियन मिनल केंगे यांनी केले.