प्रतिनिधी//अंकुश पुरी
देसाईगंज. — वडसा येथील हनुमान वॉर्डातिल श्री वैकुंट सर यांच्या घरासमोरील नाल्यांचे पाणी रोडवर वाहु लागले आणि सर्वत्र दुर्गंधी पसरण्याचे चित्र दिसून आले.लहान मुलेतिथे खेळत असतात त्यामुळे संपुर्ण पालकांच्या मनात आरोग्याच्या भितीचे वातवरण सध्या दिसुन येत आहे. शहरातील नागरिकांचा दिवसेंदिवस स्वच्छतेविषही असंतोष वाढतच यातून दिसुन येत आहे. नगरप्रशासन आणि स्वच्छतेचे कंत्राट दिलेले कंत्राट दार याकडे दुर्लक्ष करीत आहे. काही दिवसा अगोदरच वर्तमान पत्रामध्ये माजी नायब तहसीलदारांवर नाली स्वतः स्वच्छ करण्यात आली अशे वृत्त पत्रात आल्याचे दिसून आले. तरीसुद्धा नगरप्रशासन स्वच्छतेच्या संदर्भात येवळे निष्क्रिय कसे अश्या कुजबुज सध्या संपूर्ण शहरा मध्ये सुरू आहे.
काही स्थानीक नागरीकांनी मागील काही दिवसांपूर्वी प्रशासनाला स्वच्छतेविषही निवेदन देऊन विनंती करण्यात आली तेंव्हा प्रशासन वेगवेगळे कारणे सांगुन ही नगरप्रशासनाच्या हद्दीत नसल्याचे उत्तर देऊन नागरीकांची दिशाभूल करत असल्याचे यातुन समोर येत आहे. स्थानिक प्रशासन कधी जागे होणार याकडे देसाईगंज शहरवासीयांचे लक्ष लागलेले आहे. हनुमान वॉर्डातील नागरिकांनी आज फोनद्वारे विविध पक्ष्याच्या सामाजिक कार्यकरत्यांना बोलावून वॉर्डातील दुर्गंधी विषही माहीती दिली आणि त्यांना यां समस्याचे निवाहरण करून देण्याची विनंती केली. यावेळी माहिती घेतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस श्याम काका धाईत, पिंकुभाऊ बावणे युवक काँग्रेस शहर अध्यक्ष देसाईगंज, जिल्हा संघटक सचिव मनोज भाऊ ढोरे, विधानसभा संघटक सचिव मिलिंद भाऊ सपाटे, युवक शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी दीपक नागदेवे, सामाजिक करकर्ते राहुल सीडाम आणि असंख्य युवक उपस्थित होते.