केंद्र शासना द्वारा वाढत्या महागाईचा राष्ट्रवादी कोंग्रेस ने केला निषेध  शेकडो कार्यकर्त्यांचा एच पी गॅस एजन्सी समोर निषेध धरणा  

 

बल्लारपुर( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

वाढत्या महागाईचा भडका लक्षात घेता पेट्रोल, डीझल, खाद्य तेल व शेतकऱ्यांवर लादलेला काळा कायदा मागे घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस बल्लारपूर शहर व तसलुक्याच्या वतीने सिलेंडर गॅस ची प्रतिकात्मक धरणा करण्यात आला.
देशात वाढत असलेली बेरोजगारी, लॉक डाऊन मुळे देशातील जनतेची आर्थिक परिस्थिती हलाकीची झाली असतांना पेट्रोलवर 50 टक्के आणि डिझेल वर 40 टक्के लादलेला कर हा अन्यायकारक असून, जीवन आवश्यक वस्तूंच्या वाढलेल्या महागाई मुळे जनता त्रस्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तालुका व शहर काँग्रेस च्या वतीने गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल वाढत्या महांगाईच्या विरोधात केंद्र शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
प्रधानमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल व जीवन आवश्यक वस्तूंचे भाव तात्काळ कमी करण्याच्या मागणीला धरून धरना देण्यात आला .
राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हा अध्यक्षा बेबीताई उईके, जिल्हा महासचिव भाष्कर कावडे, संतोष कोन्डुपवार यांच्या मार्गदर्शनात तथा शहर अध्यक्ष बादल उराडे यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या या आंदोलनात शहर कार्यकारी अध्यक्ष राकेश सोमाणी, तालुका अध्यक्ष महादेव देवतळे, शहर उपाध्यक्ष आरिफ भाई शेख, वरिष्ठ कार्यकर्ता राजेन्द्र काबरा, संजीव अग्रवाल, रंजीतसिंग ठाकुर, कुतुबुद्दीन सिटी, प्रदीप मुरकुटे, महिला शहर अध्यक्ष अर्चना बुटले, महिला कार्यकारी अध्यक्ष शहजादि अन्सारी, युवक शहर अध्यक्ष रोहन जमगाडे, युवक कार्याध्यक्ष रोहित कैथवास, शहर युवक युवक उपाध्यक्ष संदेश पाटील, युवक तालुका अध्यक्ष सुनिल बोनगीरवार, युवा कार्यकर्ता गोलू डोहणे, नीरज तिवारी, दीपक घोगले, वामन सोनावणे, साहिल पांढरे, महिला कार्यकर्ता छाया प्रसाद मंजू मंडल, माया रविदास, फूलमती केशकर, प्रीति रविदास, रवीना कलंबे, शारदा ताई, माला उइके, प्रगति भोसले अशा शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेऊन आंदोलन यशस्वी केले.