घरफोडी करणाऱ्या टोळीचा १२ तासात शोध घेण्यात स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा ला यश. घरफोडीचे २ गुन्हे उघडकीस आणून एकूण १,८५,३४५/- रू. चा माल जप्त

 

 

वर्धा जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला

 वर्धा: दिनांक २६-०६-२०२२ रोजी फिर्यादी श्री मुकेश रामनारायण तिवारी, रा. गाडगे नगर. मसाळा, सेवाग्राम. जि. वर्धा हे पुजा अर्चा करण्याकरिता घराला कुलुप लाऊन बाहेर गेले असता कुणीतरी चोरट्याने घराचे स्वयंपाक घराची सिमेंटची खिडकी तोडून घरात प्रवेश करून घरातून नगदी १,००,०००/- रू. व सोन्या चांदीचे दागिने असा जुमला किंमती रू १,०५,०००/- रू. चा माल चोरून नेला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे अप. क्र. ३६५/२०२२ कलम ४५४, ४५७, ३८०, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
मा. पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या २ पथकाकडून सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरु असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सदर गुन्हा हा पोच्चांना ऊर्फ घनश्याम देऊलकर याने त्याचे साथीदारासह केला असून त्याचे राहते घरी चोरी केलेल्या मालाची हिस्से वाटणी सुरू आहे. मिळालेल्या महिती वरून छापा टाकून आरोपी १) घनश्याम ऊर्फ पोचन्ना देवराव देऊळकर वय 22 वर्ष, २) राजु ऊर्फ काल्या रामा दांडेकर, वय २२ वर्ष, ३) किसना रमेश राऊत, वय ३० वर्ष, ४) बबलू ऊर्फ कटप्पा मधुकर धोतरे, वय २५ वर्ष, ५) शंकर भगवान सातपुते, वय २२ वर्ष, रा. सर्व वडर झोपडपट्टी, गिट्टीखदान, बोरगाव (मेघे), वर्धा. यांना वडार वस्ती, बोरगाव मेघे वर्धा येथून शिताफीने ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत सखोल विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांचेकडून १) नगदी ९३,७००/- रू. २) सोने व चांदीचे दागिने किंमत ५,६१५/- रू. ३) गुन्हा करण्याकरिता वापरलेल्या दोन स्प्लेंडर मोटार सायकल किंमत ८०,०००/- रु. ४) गुन्हा करण्याकरीता वापरलेला १ मोबाईल किं.६,०००/- रू. असा एकूण १,८५,३१५/- रू. चा माल जप्त करून वर नमूद गुन्हा उघडकीस आणला. तसेच सदर आरोपीतांनी पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे दाखल अप. क्र.६७७/२०२१ कलम ४५४, ४५७, ३८० भा.दं.वी चा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी हे अट्टल घरफोडी करणारे गुन्हेगार असून त्यांचेकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

 

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात पो.नि. श्री. संजय गायकवाड, स.पो.नि. श्री महेंद्र इंगळे यांचे निर्देशांप्रमाणे पोउपनि. श्री अमोल लगड, पोलीस अंमलदार निरंजन वरभे, गजानन लामसे, रणजीत काकडे, यशवंत गोल्हर, प्रफुल वाघ, अभिजित वाघमारे, अमोल ढोबाळे, राजेंद्र जयसिंगपुरे, गोपाल बावनकर, रितेश शर्मा, महिला पोलीस अंमलदार अलका कुंभलवार, जोत्सना शेळके, चालक अखिल इंगळे, सायबर शाखेतील निलेश कट्टोजवार, दिनेश बोथकर यांनी केली.