वर्धा जिल्हा प्रतिनिधि // उमंग शुक्ला
वर्धा:मनिष अवचित चव्हाटे रा. समता नगर वर्धा हे पेटींगचे काम करत असुन दिनांक 26/06/2022 रोजी सकाळी आपली होंडा अक्टीवा मोपेड क्रमांक एम.एच. 32 झेड 8661 ने आपले कामाचे पैसे आणण्यासाठी भिमनगर येथे गेले गाडी पेट्रोलपंपाचे बाजुला खाली जागेत लावुन पैसे मागुन परत आले असता गाडी लावलेल्या ठिकाणी दिसली नाही आजु बाजुला शोध घेवुन ती मिळुन आली नाही कोणतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याने त्यांनी घटनेची तक्रार पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे नोंदविल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता .
पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे तक्रार प्राप्त होताच गुन्हे शोध पथकाचे पो. हवा. संजय पंचभाई यांनी तपासाची चक्रे फिरवित गुप्त बातमीदार यांचे कडुन प्राप्त झालेल्या माहीती वरून बंटी लोटण यादव रा. स्टेशनफैल वर्धा यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन होंडा अक्टीवा क्रमांक एम.एच.32 झेड 8661 किंमत 40,000/- रू. ची जप्त करून अल्पावधीतच गुन्हा उघडकिस आणला.
सदरची कार्यवाही मा. प्रशांत होळकर सा. अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकि सा. उप विभागीय पोलीस अधीकारी पियुश जगताप साहेब यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांचे निर्देशानुसार पो.स्टे.च्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार संजय पंचभाई, सुनिल मेंढे, शाम सलामे यांनी केली.