आष्टी/मांडगाव:दिनांक 27 जून मांडगाव येथे पाऊस येत नसल्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढत वरुणराजाला साकडे घातले आहे त्यात डोक्यावर टोपली घेत त्यात मेंढक नावाचा प्राणी व त्याची पूजा अर्चा करत ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली सर्वप्रथम मांडगाव येथील नाग मंदिरामध्ये परिसरातील सर्व नागरिक महिला पुरुष व लहान मुलं गोळा झाली सगळ्यांनी आपापल्या घरून गुंड बादल्यांमध्ये पाणी भरून आणले होते नागरिकांनी एकमेकांना देवाला भिजून वरुण राजाला पाण्याची साकडे घातले
“मेनका राणी येऊ दे
धान कोंडा पिकू दे ”
असा जयघोष करत नंतर ही मिरवणूक गावातल्या प्रत्येक मंदिरात जात प्रत्येक मंदिरामध्ये पूजा करण्यात आली विशेष म्हणजे मिरवणूक चालू असताना पावसाच्या सरी आल्या सुद्धा
या विज्ञान युगात या गोष्टी कोणी मानत नसताना खेडेगाव मध्ये अजूनही पारंपारिक गोष्टींवर विश्वास ठेवला जातो
काहीही असले तरी मांडगाव परिसरात पाऊस सरी कोसळल्याने शेतकरी सध्या तरी आनंदी झाला आहे