तालुका विधी सेवा समिती, आष्टीतर्फे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर ममदापूर येथे संपन्न

 

दिनांक २७/०६/२०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता.ग्रामपंचायत ममदापुर ता आष्टी येथे आयोजित करण्यात आले सदर शिबिरामध्ये तालुका विधी सेवा समिती अध्यक्षा,एफ टी शेख न्यायालयीन कर्मचारी, आष्टी पोलिस कर्मचारी, ग्रा. पं. ममदापुर येथील सरपंच/सचिव, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, आष्टी आणि परिसरातील नागरीक उपस्थित होते. शिबिराचे प्रास्थाविक अॅड. श्री. यु. एस. बेलेकर यांनी केले. यावेळी तालुका विधी सेवा समिती अध्यक्षा एफ टी शेख यांनी उपस्थित नागरीकांना मुलभुत हक्क व कायदेबाबत मार्गदर्शन केले. तसेच अॅड. श्री. बी. मतले, अॅड. श्री. जे. डी. जाणे, अॅड गायकवाड ॲडव्होकेट स्वाती चौधरी श्री. सरकारी अधिवक्ते उमेश सोरते यांनी नागरीकांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. शिबिराचे आभार प्रदर्शन अॅड. श्री. यु. एस. बेलेकर यांनी केले अशा प्रकारे ममदापूर येते कायदेविषयक शिबीर पार पडले