आर्वी प्रतिनिधी //उमंग शुक्ला
आर्वी: तालुक्यातील सारंगपुरी तलाव निसर्ग पर्यटन आर्वी येथे तालुका विधी सेवा समिती आर्वी , महाराष्ट्र वन विभाग वन परिक्षेत्र कार्यालय आर्वी, तहसिल कार्यालय आर्वी, उपजिल्हा रुग्णालय आर्वी, कृषी विभाग आर्वी, नगर परिषद आर्वी,उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आर्वी, पोलीस स्टेशन आर्वी, पंचायत समिती आर्वी, यांच्या संयुक्त विद्यमाने आर्वी न्यायालय परीसर आणि वनपरिक्षेत्र निसर्ग पर्यटन क्षेत्र सारंगपुरी या दोन्ही परीसरात वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी तालुका विधी सेवा समिती, दिवाणी व फौजदारी न्यायालय आर्वी, येथील दिवाणी न्यायाधिश वी. आर. घरळ (कनिष्ट स्तर )आर्वी,सह दिवाणी न्यायाधिश आर .एल. राठोड (कनिष्ट स्तर) आर्वी, हरीश धार्मिक उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक आर्वी,सुनिल साळुंके उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी,
भानुदास पिदुरकर (पोलीस निरीक्षक) पोलीस स्टेशन आर्वी,विद्यासागर चव्हाण (तहसिलदार)तहसिल कार्यालय आर्वी,नितीन जाधव (आर.एफ.ओ.) महाराष्ट्र वन विभाग वनपरिक्षेत्र कार्यालय आर्वी, सुप्रिया वायफळ (टि.ए.ओ.)तालुका कृषी अधिकारी विभाग आर्वी,आशीष गोस्वामी.
(पी.एफ.ए.) आर्वी.
प्रमोद नागरे (एन.सी.सी.अधिकारी) 21 महाराष्ट्र बटालियन गांधी विद्यालय प्लॅटून, आर्वी.
डाॅ.अरुण पावडे.
पावडे हॉस्पीटल आर्वी.
अमोल कदम (नायब तहसीलदार) तहसिल कार्यालय आर्वी, विनायक मगर साहेब (नायब तहसीलदार )तहसिल कार्यालय आर्वी,
अमोल पाटील अन्न पुरवठा अधिकारी तहसील कार्यालय आर्वी,गावंडे साहेब.
(बी. डी.ओ.) पंचायत समिती आर्वी.
मोहन सुटे (वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय आर्वी)
डॉ नंदकिशोर कोल्हे
(उपवैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय आर्वी)
रणजित पवार उपमुख्यधिकारी नगर परिषद आर्वी यांच्या सहकार्याने श्रमदानातून वृक्षलागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर वृक्षारोपण हे आर्वी न्यायालय परिसरात व सारंगपुरी तलाव निसर्ग पर्यटन आर्वी येथे वृक्ष लागवड झाल्यावर वृक्ष लागवड केल्यानंतर वृक्ष प्रतिज्ञा केली तसेच राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी केली व जनजागृति रॅली काढून सारंगपुरी निसर्ग पर्यटन क्षेत्रात विविध फळ प्रजाती, सावली देणारे, शोभेचे झाडं असं मिळून एकूण 850 झाडं लावण्यात आले.सदर श्रमदानातून वृक्षलागवड कार्यक्रम पार पडला सारंगपूरी तलाव निसर्ग पर्यटन क्षेत्रात जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट घ्यावी अशी इच्छा व्यक्त करत कार्यक्रम ला उपस्थीत सर्वांचे आभार प्रदर्शन वन परिक्षेत्र अधिकारी नितीन जाधव यांनी मानले