रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय वर्धा येथिल कृषीदूतान कडून मित्र व शत्रू किड्यांन बदल मार्गदर्शन

 

 

कारंजा तालुका प्रतिनिधी// धिरज कसारे

वर्धा: सेलू तालुक्यातील बाबुळगाव येथे उत्पादन वाढीसाठी शेती या मुख्य व्यवसायासह जोड व्यवसायाचीही मदत शेतकरी घेऊ लागले आहेत. शिवाय शासकीय योजना आणि नवनवीन प्रयोग यामुळे शेती संबंधी व्यवसाय सुरु करणेही शक्य झाले आहे. अशाच उत्पादनात भर टाकणारा व्यवसाय म्हणजे

मधमाशी, लखकिटक, रेशीमकीडी पालन व्यवसाय बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शेतीशी संलग्न हे व्यवसाय शेतीचे उत्पन्न वाढवण्यात सुद्धा मदत करतात. अल्पभूधारकांसाठी चांगला पर्याय हे पटवून दिले.

यावेळी रामकृष्ण बजाज त्यांना कृषी महाविद्यालय, वर्धा येथील चतुर्थ वर्षांतील विद्यार्थी कृषिदुत राहुल माने ,सुमित डोबले,दिप कुंभरे,राहुल पटले ,शुभम मस्के ,केतन खवशी ,वैभव कुराहे
यांनी या व्यवसायचे महत्व, प्रक्रिया, नफा, सरकार द्वारा दिले जाणारे अनुदान व त्यांचे संवर्धन याबद्दल लोकांना जागरूक करून मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. बी. के. सोनटक्के, कार्यक्रम अधिकारी पी. एस. खोडके, कार्यक्रम समन्वयक डॉ. राणी काळे व वैभव गिरी यांचे मार्गदर्शन लाभले.