एटापल्ली :आज तालुका काँग्रेस एटापल्ली तर्फे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविले आहे या निवेनात अशे म्हटले आहे की एटापल्ली तालुक्यातील जेवेली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पिपली बुर्गी येथे शाषणाने 7 कोटी रुपये खर्च करून प्रशस्त इमारत उभी केली आहे परंतु प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पूर्ण होऊन 8 महिने झाले परंतु अजून पर्यंत इमारतीचे उद्घाटन झाले नाही आणि आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली नाही
प्राथमिक आरोग्य केंद्र ही शोभेची वास्तु बणली असून सदर ठिकाणी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनची तात्काड नियुक्ती करून प्राथमिक आरोग्य केंद्र पिपली बुर्गी येथील रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात यावे अन्यथा तालुका काँग्रेस कमिटी एटापल्ली तर्फे आंदोलन उभारण्यात येईल अशे निवेदनात नमूद केले आहे