गोंदने वाले बाबा दर्गा वर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाही करा,मुस्लिम एकता मंच तर्फे निवेदनातून मागणी

 

जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला

 

वर्धा:आजदापूर येथील पांदन रस्ता व हझरत नंन्हे शाह वली उर्फ गोंदण वाले बाबा दर्गाह याच्या वर अवैध रित्या अतिक्रमण करून जबरण कब्जा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती वर कार्यवाही करण्या बाबत.उपविभागीय पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे

सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की निवेदनात असे नमूद केले आहे की

मौजा आजदापूर येथील पांदन रस्ता व नंन्हे शाह वली उर्फ गोंदण वाले बाबा दर्गाह याच्या वर परिवर्तीत शेत सर्वे नं.30 धारक संजय पंजाबराव मानकर यांनी अवैध रित्या अतिक्रमण करून कब्जा करण्याचा प्रयत्न करीत आहे. सदर पांदन रस्ता व दर्गाह याच्या उल्लेक जुन्या दस्तावेज मध्ये पहायला मिळतो सदर व्यक्तीनी आपल्या ७/१२ मध्ये अवैध रित्या फेर बदल करून शेताची आराजी १.८३ वरून १.९८ आर.केली आहे आणि तिथे असलेल्या हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेले हझरत नंन्हे शाह वली गोंदण वाले बाबा यांच्या दरगेहची विडंबना करून या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने तिथे तोडफोड करून हिंदू मुस्लीम भक्तांच्या धार्मिक भावनेला ठेस पहोचविण्याचा प्रयत्न केला आहे तिथे जाणाऱ्या हिंदु मुस्लीम स्त्री व पुरुष भक्तांसोबत शिवीगाळ करून इथे दर्गाह नसून इथे एक समाधी असल्याचा तो दावा करतो जेव्हा की हि दर्गाह २५० ३०० वर्ष जुनी आहे व हा विकृत मानसिकतेचा व्यक्ती या शेताचा ५वा मालक आहे इच्या आदी हा शेत विजय श्रीपाद देशपांडे व त्यांच्या पूर्वजांचा होता व त्या काळात हि दर्गाह तिथे होती. पण हा व्यक्ती वारंवार द्वेषपूर्ण भावनेने तिथे तोडफोड करून व भाविकान सोबतशिवीगाळ करून सांप्रदायिक दंगल भडकविण्याचा प्रयत्न करीत आहे तरी आपणास नम्र विनंती करतो की अश्या विकृत मानसिकतेच्या व्यक्ती वर आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करून या अश्या घटनांवर अंकुश लावण्याकरिता विनंती.केली आहे