भूमिका खारपाटे दहावीत प्रथम आल्याने माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी केला सत्कार. माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी शाल व श्रीफळ देऊन केला सत्कार.

 

हिंगणघट:- २१ जुन २०२२
हिंगणघाट तालुक्यातून दहावी परीक्षेत प्रथम येण्याचा माण महेश ज्ञानपीठची विद्यार्थिनी कुमारी भूमिका शैलेश खारपाटे हिने ९६.२० टक्के गुण घेऊन प्रथम आल्याबद्दल तिचे स्वागत हिंगणघाट विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केले व पुढील शैक्षणिक भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यावेळी स्वागत करताना सोबत नगरपरिषद हिंगणघाटचे गटनेता सौरभ तिमांडे, राजेश धोटे, निखील वदलनवार, अमोल त्रिपाठी, रोशन देवतळे, मनिष धोटे मनोज घुंगरूड, रणजित भोसले, विपुल वानखेडे इत्यादींनी अभिनंदन केले.त्याप्रसंगी कु. भूमिका खारपाटे तिचे, आजोबा सुभाषराव खारपाटे आई श्रीमती सुषमा खारपाटे सौ.मीनाक्षी खारपाटे भाऊ संस्कार खारपाटे बहिण ज्ञानही पंकज खारपाटे इत्यादी परिवारातील मंडळी उपस्थित होते.
भूमिका खारपाटे हिचे वडील यांचे हिंगणघाट नगर परिषदेच्या स्वच्छता अभियाना अंतर्गत अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये अपघाती निधन झाले.भूमिकाचे कुटुंब निराधार झाल्यामुळे रोजगारासाठी नगरपरिषद हिंगणघाटने खाली जागा किंवा दुकानासाठी गाळा कुटुंबाचे पालन पोषण उदरनिर्वाह करण्यासाठी मागील पाच वर्षांपूर्वी तिची आई श्रीमती सुषमा शैलेश खारपाटे यांना प्राधान्य देण्यात येईल असे पत्र दिले होते. परंतु अजून पर्यंत नगरपरिषद हिंगणघाट यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी कोणतेही जागा किंवा गाळा उपलब्ध करून दिला नाही अशी प्रतिक्रिया कुटुंबांनी व्यक्त केली. कु.भूमिका खारपाटे हीच्या आजोबांच्या मकानाच्या किरायावर या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे.अशा हालाखीच्या परिस्थिती मधून कुटुंबाची वाटचाल सुरू आहे. तरी नगरपरिषद ने दिलेल्या पत्राची अंमलबजावणी करून जागा उपलब्ध करून द्यावी त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकेल असे मत खारपाटे परिवाराने माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या समोर व्यक्त केले.