जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला
वर्धा: वर्ध्यातील आर्वी तळेगांव राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे बांधकाम रखडले असल्याने या रस्त्याचे काम होण्यासाठी अनेकदा आंदोलन करण्यात आले. मात्र तीन वर्षापासून अजूनही रस्ता पूर्णत्वास गेला नसल्याने काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी वसंतराव नाईक चौक(आर्वी-वर्धा टि पॉईंट) आर्वी येथे आंदोलन करण्यात आले. मात्र सात दिवस लोटले असूनही काम सुरू करण्यात आले नसल्याने आज वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले खासदारांच्या घरासमोर माजी आमदार अमर काळेसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. उद्या या रस्त्याचे त्वरित बांधकाम होण्यासाठी स्वतः भाजपचे खासदार रामदास तडस व काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे हे काँग्रेस कार्यकर्तेसोबत होमहवन करण्यात येणार आहे. यावेळी खासदार यांच्या नेतृत्वाखाली होमहवन केले जाईल असे व्यक्त रामदास तडस यांनी काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना व आंदोलन स्थळी शब्द देण्यात आला काँग्रेसचे कार्यकर्तेसोबत पोलिसाचा बाचाबाची
वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या घरासमोर काँग्रेसचे माझी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वाखाली आज शेकडो कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. आंदोलन सुरू होताच पोलिसांनी खासदार यांच्या घरासमोर आंदोलकांना जाण्यास रोखले व त्यानंतर खासदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली.घोषणाबाजी सुरू असताना ढोलताशे वाजवण्यात आले मात्र ढोलताशे वाजवू नये यासाठी पोलिसांनी मज्जाव केला
त्याचवेळी काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिसांशी भिडले. यात पोलिसांशी काही काळ बाचाबाची झाली त्यावेळी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त उपस्थित होत