गांधी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

 

वर्धा जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला

वर्धा:नगर परिषद गांधी विद्यालय मध्ये 21 जून रोजी योगा दिवस उत्साहात साजरा झाला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नगरपरिषद विद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये प्राचार्य शुभांगी इंगोले तसेच पर्यवेक्षक व्ही टी पायले , सर्व शिक्षक, शिक्षिका एनसीसी छात्र सैनिक ,स्टुडन्ट पोलीस कॅडेट, विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .या सर्वांना एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आसन तसेच प्राणायाम आणि त्यांचे फायदे यावर सखोल मार्गदर्शन केले.