एटापल्ली:केंद्र सरकारने भारतीय सैन्यदल भरती प्रक्रियेत नव्याने लागू केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात देशभर युवकांमध्ये असंतोषाचे वातारण आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सैन्यदल भरती प्रक्रिया खोळंबल्याने २०२१-२२ मध्ये फक्त चार फेऱ्या संरक्षण विभागामार्फत राबविण्यात आल्या होत्या. कोविड प्रादुर्भाव कमी झाल्याने भरती प्रक्रियेला गती मिळेल या आशेने देशातील लाखो तरुण तरुणी सैन्यदलात सहभागी होण्याचे स्वप्न मनोमन बाळगून त्यासाठी अहोरात्र मेहनत घेत होते परंतु केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात सैन्यदल भरती प्रक्रियेत अमुलाग्र बदल आणत भरतीचे एकूणच स्वरूप बदलून टाकल्याने युवकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी या असंतोषाचे हिंसेत रूपांतर होऊन परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे. सैन्यदलात चार वर्षांचे कंत्राट लागू करून आपण भारतीय सार्वभौमत्वासोबत समझोता करत आहोत, प्रस्तावित अग्निपथ योजना ही देशविरोधी असून आधीच बेरोजगारीच्या बोजाखाली दबलेल्या तरुणांना निराशेच्या गर्तेत ढळणार आहे, या अनुषंगाने आम्ही खालील मागण्या करीत आहोत
• सैन्य दलातील पदांचे कंत्राटीकरण करणारी अग्निपथ ही योजना मागे घ्यावी, तसेच जुनी भरती प्रक्रिया पूर्ववत करावी.
• सैन्य दलात १.२५ लाख व अर्ध सैनिक तसेच निमलष्करी दलात ७५ हजार अशी एकुण २ लाख रिक्त पदे पुर्ण वेळ त्वरित भरावीत.
केंद्र सरकार ने अग्निपथ योजना रद्द करावी अशी मागणी निवेदनात म्हटले आहे